धक्कादायक: प्रवास इतिहासाची माहिती अधिकाऱ्यांना दिली म्हणून केला खून

धक्कादायक: प्रवास इतिहासाची माहिती अधिकाऱ्यांना दिली म्हणून केला खून

Workman dies of electric shock

कोरोना व्हायरसने बिहारमध्ये शिरकाव केला आहे. यासोबत द्वेष देखील पसरत आहे. सोमवारी संध्याकाळी बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून असे दिसून येते की कोविड-१९च्या उद्रेकामुळे समाजात द्वेष पसरत असल्याचे दिसून येत आहे. बिहारमध्ये परराज्यातून आल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली म्हणून एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. बबलू असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रुन्निसैदपूर ब्लॉकमधील माधौळ खेड्यातील रहिवासी होता. कोरोना व्हायरस गावात पसरु नये म्हणून जागरूक बबलूने अधिकाऱ्यांना माहिती दिली. पण त्याला हे माहित नव्हते की यामुळे त्याचा मृत्यू होईल.

महाराष्ट्रातील दोन परप्रांतीय कामगार या आठवड्याच्या सुरूवातीला माधौळ गावात त्यांच्या मूळ घरी परत आले. राज्य शासनाने सार्वजनिक वापरासाठी दिलेल्या निर्देशानुसार बबलू यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांच्या आगमनाविषयी माहिती देण्याचे ठरविले. त्यानंतर कोविड -१९ चाचणीसाठी नमुने गोळा करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चमूने दोन प्रवासी कामगारांचे दरवाजे ठोठावले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या आगमनाने दोन प्रवासी संतापले, त्यांनी आपले नमुने अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पाच जणांसह बबलूच्या घरी धाव घेतली. त्यानंतर सात जणांच्या गटाने आरोग्य अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातून आल्याची माहिती दिल्याबद्दल बबलूचा खून केला.


हेही वाचा – हिटमॅन रोहित शर्माने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिले ८० लाख


दरम्यान, खूनाची माहिती स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचताच हल्ल्यात सामील झालेल्या सातही लोकांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेनंतर कोरोना संबंधीतची माहिती देण्याची हिंमत कोण करेल? हजारो स्थलांतरित कामगारांनी विविध भारतीय राज्यांमधून बिहारमधील मूळ गावी गेले आहेत. बिहार सरकारने स्थानिक पंचायतीच्या मदतीने खेड्यांबाहेर अलगाव केंद्रे सुरू केली आहेत परंतु मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करून स्थलांतर करणारे कामगार या अलगाव केंद्रांसाठी घर सोडण्यास नकार देत आहेत. खरं तर, राज्य शासनाने इतर राज्यांमधून कोणत्याही परप्रवासी कामगारांच्या आगमनाबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अशी विनंतीही ग्रामस्थांना केली होती.

 

First Published on: March 31, 2020 12:28 PM
Exit mobile version