हिटमॅन रोहित शर्माने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिले ८० लाख

रोहित शर्माने पंतप्रधान सहाय्यता निधीत ४५ लाखांची मदत केली आहे.

Rohit Sharma
हिटमॅन रोहित शर्माने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिले ८० लाख

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक दिग्गज मदतीसाठी पुढे आले आहेत. हिटमॅन रोहित शर्माही मदतीसाठी पुढे आले आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोहितने चार संस्थांना आर्थिक मदत दिली आहे. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी मदत केली. सचिन तेंडूलकरने २५ लाख केंद्राला आणि २५ लाख राज्य सरकारला दिले आहेत. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला आहे.


हेही वाचा – मास्क ते वेंटिलेटर…जाणून घ्या भारताची कोरोना विरुद्धची तयारी


रोहित शर्माने पंतप्रधान सहाय्यता निधीत ४५ लाखांची मदत केली आहे. शिवाय त्याने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये दिले. यासह फिडींग इंडिया संस्थेला ५ लाख तर भटक्या कुत्र्यांचे कल्याणासाठी ५ लाख दिले आहेत. असे एकूण ८० लाख रुपये मदत म्हणून दिले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली.

भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १० लाखांची मदत केली आहे. भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने त्याच्या फंडातून १ कोटींची मदत दिल्ली सरकारला केली आहे. तर भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ५० लाख रुपयांचे तांदुळ गरजूंना दान केले आहेत. बीसीसीआयने ५१ कोटींची मदत केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) राज्य सरकारला ५० लाखांची मदत केली.