सबका साथ, सबका विकास एक धोका, ओवैसींचा मोदी सरकारवर आरोप

सबका साथ, सबका विकास एक धोका, ओवैसींचा मोदी सरकारवर आरोप

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही मोदी सरकारची घोषणा एक धोका आहे, असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या कर्जात मोदी सरकार भेदभाव करत असल्याचाही आरोप ओवैसींनी केला आहे.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत स्वानिधी योजनेतून गरीब आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना घरासाठी कर्ज पुरवलं जातं. या योजनेअंतर्गत मोदी सरकारने आतापर्यंत ३२ लाख जणांना कर्ज पुरवठा केला असून केवळ ३३१ अल्पसंख्याक नागरिकांना कर्ज दिलं आहे. मोदी सरकारची सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, ही घोषणा धोका असल्याचा आरोप देखील ओवैसी यांनी केला आहे.

कोरोना विषाणूच्या काळात मोदी सरकारने कुणालाही न विचारता लॉकडाऊनची घोषणा केली. यामध्ये सर्वात जास्त नुकसान दलित, अल्पसंख्याक आणि अनुसूचित जमातीचं झालं, असा आरोपही असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.


हेही वाचा : बिनशर्त माफी मागा आणि…स्मृती इराणींची काँग्रेस नेत्यांना नोटीस


 

First Published on: July 24, 2022 6:58 PM
Exit mobile version