येत्या १० दिवसात देशात लसीकरणाला होणार सुरुवात – केंद्रीय मंत्रालय

येत्या १० दिवसात देशात लसीकरणाला होणार सुरुवात – केंद्रीय मंत्रालय

प्रातिनिधीक फोटो

देशातील दोन कोरोना लसींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सध्या कोरोना लसीकरणाला कधी सुरुवात होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. पण आता लसीला मंजूरी दिल्यानंतर १० दिवसात देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात केले गेलेले लसीकरणाचे ड्राय रन यशस्वी झाले आहे. दरम्यान ३ जानेवारीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआई)ने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कोवॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

मंत्रालयाने सांगितले की, ‘दररोज कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रकरणाचे प्रमाण ३ टक्के कमी झाले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २.५ लाख आहे. यामध्ये फक्त ४४ टक्के रुग्ण रुग्णालयात असून ५६ टक्के प्रकरण एसिम्प्टोमॅटिक किंवा सौम्य लक्षणे वाले आहेत, ते सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.’ गेल्या आठवड्यात भारतात प्रति लाख लोकसंख्येमध्ये फक्त ९६ नवे प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये प्रति लाखात एकाचा मृत्यू होत आहे, असे सरकारने पत्रकार परिषदेते स्पष्ट केले आहे.

दरम्यान पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना कोरोना लस दिली जाईल. यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना लस दिली आहे.


हेही वाचा – वॅक्सिन वॉर संपुष्टात, सीरम – भारत बायोटेक एकत्र काम करणार


 

First Published on: January 5, 2021 5:22 PM
Exit mobile version