जैश-ए-मोहम्मदच्या चार इमारती उद्धवस्त, SAR च्या सहाय्याने घेण्यात आले फोटो

जैश-ए-मोहम्मदच्या चार इमारती उद्धवस्त, SAR च्या सहाय्याने घेण्यात आले फोटो

जैश-ए-मोहम्मदच्या इमारती उद्धवस्त

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद संघटनेकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्याला भारतीय हवाई दलाने ‘एअर स्ट्राईक‘ करत २६ फेब्रुवारीला चोखप्रत्युत्तर दिले आहे. या ‘एअर स्ट्राईक’मध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये मदरसा तालीम -उल-कुराणच्या चार इमारती उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. मात्र सध्या टेक्निकल आणि ग्राऊंड इंटेलिजन्सची मर्यादा असल्या कारणाने नेमके किती दहशतवादी मारले गेले आहेत याची नेमकी माहिती देणे थोडे काल्पनिक असेल असेही सांगण्यात आले आहे.

मिराजने केले दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांकडे सिथेंटिक अपर्चर रडारच्या (SAR) सहाय्याने घेण्यात आलेले फोटो पुरावे म्हणून उपलब्ध आहेत. या फोटोंमध्ये टार्गेट करण्यात आलेल्या चार इमारतींना मिराज २००० ने पाच S-२००० प्रिसिजन गायडेड म्युनिशन (PGM) च्या सहाय्याने उद्धवस्त करण्यात आल्याचं दिसत आहे.

भारताने केले ‘एअर स्ट्राईक’

भारताने ‘एअर स्ट्राईक’ केल्याचं पाकिस्तानने मान्य केले आहे. मात्र तिथे दहशतवाद्यांचे तळ होते किंवा काही नुकसान झालं आहे हे मान्य करण्यास पाकिस्तानाने नकार दिला आहे. एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना विचारलं आहे की,’हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने मदरशांना सील का केलं? पत्रकारांना मदरशात का जाऊ दिलं नाही’?

‘आमच्याकडे SAR च्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंच्या स्वरुपात पुरावा आहे की एक इमारत गेस्ट हाऊसप्रमाणे वापरली होती. तिथे मौलाना मसूद अझहरचा भाऊ राहत होता. तसेच एक एल आकाराची इमारत होती जिथे प्रशिक्षण घेणारे दहशतवादी देखील राहत होते. तर दोन मजल्याच्या एका इमारतीतही प्रशिक्षण घेणारे राहत होते. तसेच एका इमारतीत कॉम्बॅट ट्रेनिंगच्या शेवटच्या टप्प्यात असणारे राहत होते. या सर्व इमारतींनी बॉम्बने टार्गेट करत उद्ध्वस्त करण्यात आले’, आहेत.

SAR ने घेतलेले होतो स्पष्ट नाहीत

अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे SAR ने घेतलेले फोटो सॅटेलाईट फोटोंइतके स्पष्ट नाही आहेत. मंगळवारी ढग दाटले होते. त्यामुळे आम्ही सॅटेलाईटच्या सहाय्याने चांगले फोटो घेऊ शकलो नाही, अन्यथा प्रश्नच मिटला असता. तसेच हे फोटो सार्वजनिक करायचे की नाही हा निर्णय राजकीय नेतृत्वाला घ्यायचा आहे.

हल्ला केलेली जागा सील केली

अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेशी बोलताना सांगितलं की, ‘मदरशांची निवड सावधगिरी बाळगून करण्यात आली होती कारण ही जागा निर्मनुष्य ठिकाणी होती, तसेच सामान्य नागरिक मारले जाण्याचीही भीती होती. पण हवाई दलाला योग्य वेळी अचूक माहिती मिळाली’.

या बॉम्बचा करण्यात आला वापर

भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यामध्ये इस्त्राइल बनावटीच्या बॉम्बचा वापर केला आहे. हे बॉम्ब फक्त इमारत नष्ट नाही करत तर हे बॉम्ब इमारतीच्या आता घुसून नुकसान करतात. तसेच ज्या ठिकाणी हा हल्ला झाला आहे ती जागा सध्या पाकिस्तानी लष्कराने सील केली आहे. त्यामुळे कोणतीही माहिती मिळवणं गुप्तचर यंत्रणांसाठी कठीण होत आहे. त्यामुळे एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा सध्या काल्पनिक आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – पाकिस्तानचे षडयंत्र; सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये ‘विष’ टाकण्याचा प्लॅन

हेही वाचा – पाककडून शस्त्रसंधीने उल्लघंन; एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा मृत्यू


 

First Published on: March 2, 2019 1:36 PM
Exit mobile version