घरदेश-विदेशपाकिस्तानचे षडयंत्र; सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये 'विष' टाकण्याचा प्लॅन

पाकिस्तानचे षडयंत्र; सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये ‘विष’ टाकण्याचा प्लॅन

Subscribe

पाकिस्तानच्या गुप्तेहर संघटनचे मोठे षडयंत्र समोर आले आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये विष कालवून मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्याचा प्लॅन पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सीमेवर पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच असताना, आता दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी ‘द इंटर’ सर्व्हिसेस इंटेलिजेन्स’ (आयएसआय) या पाकिस्तानच्या गुप्तेहर संघटनचे मोठे षडयंत्र समोर आले आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय पुन्हा एका जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे नुकसान करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये विष कालवून मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्याचा प्लॅन पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर विष प्रयोग करण्यासाठी ईसीस आपल्या काश्मीरमधील एजेंटचा वापर करु शकेल, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

jammu kashmir : pakistan army and isi poisoned conspiracy against indian security forces jammu kashmir

- Advertisement -

असा करण्यात आला ‘पुलवामा’चा भ्याड हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद संघटनेकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवान शहीद झाले असून २० जवान जखमी झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या जवानांच्या बसला जोरदार धडक दिली. त्यावेळी स्फोट होऊन घटनास्थळी रक्तमांसाचा सडा पडला आणि हा इतिहासातील सर्वात मोठा असा हल्ला होता. यापूर्वी उरीच्या हल्ल्यात देखील १७ जवान शहीद झाले होते. मात्र हा हल्ला उरी हल्ल्यापेक्षाही मोठा आहे.

सीआरपीएफचे २ हजार ५०० पेक्षा जास्त जवान सुट्टी संपवून काश्मीर खोर्‍यात ड्युटीवर परतत होते. हे सर्व ७८ वाहनांच्या ताफ्यातून प्रवास करत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. ही घटना श्रीनगर-जम्मू हायवेवरील लाटूमोडमध्ये अवंतीपुरा भागात घडली होती. स्फोटक भरलेले वाहन आत्मघाती दहशतवादी अदील मोहम्मद नावाचा दहशतवादी चालवत होता. तो पुलवामा जिल्ह्यातील कोकरापारा येथील रहिवाशी आहे. २०१८ मध्ये तो ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. ज्या बसला दहशतवाद्यांच्या वाहनाने धडक दिली होती त्या बसचा केवळ लोखंडी सांगाडा उरला. या हल्ल्यात इतरही काही बसेसचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाककडून शस्त्रसंधीने उल्लघंन; एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – भारतीय लष्कराचा पाकवर स्ट्राईक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -