‘बदला अजून पूर्ण झालेला नाही’, इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्पना इशारा

‘बदला अजून पूर्ण झालेला नाही’, इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्पना इशारा

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी

‘बदला अजून पूर्ण झालेला नाही. बदला दुसराच काही तरी असणार आहे. त्यामुळे आपल्याला अधिक मजबूत होण्याची गरज आहे. आपण जर अधिक मजबूत झालो तर, शत्रू आपले नुकसान करु शकणार नाही. तसेच अमेरिकाबरोबर असलेली आपली वैरभावना कधीच संपणार नाही. त्यामुळे क्षेपणास्त्र हल्ला ही फक्त अमेरिकेला लगावलेली एक चपराक आहे’, असे वक्तव्य इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी राष्ट्राला उद्देशून केल्याचे इराणीयन प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

आपण आपल्या शत्रूला ओळखले पाहिजे

‘आपण आपल्या शत्रूला ओळखले पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या योजना, पद्धत देखील जाणून घेतली पाहिजे. तसेच राजकीय आणि लष्करी दृष्ट्या त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याकडे लोक आहेत. अमेरिका आपला शत्रू आहे. मंगळवारी रात्री आपण त्यांना चपराक लगावली. या भागातील अमेरिकेचा अपवित्र वावर संपला पाहिजे. अमेरिकेमुळे या प्रदेशाचे नुकसान झाले आहे. ते चर्चा करण्याबद्दल बोलतात पण त्यांना हस्तक्षेप करायचा आहे. हे कुठेतरी संपले पाहिजे’, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.

इराणमधील एका वृत्तवाहिनीने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार इराणने अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात ८० जण मारले गेले असल्याचा दावा देखील करण्यात आला होतो. इराणमधील इंग्लिश न्यूज चॅनेल प्रेस टीव्हीने यासंबंधी ट्विट केले. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक जण मारले गेले आहेत. जर न्यूज चॅनेलने केलेल्या दाव्यात तथ्य असेल तर अमेरिकेसोबतची लढाई अजून गंभीर स्वरुप धारण करु शकते, अशी चिन्हे दिसून येत आहेत.


हेही वाचा – नक्की झालंय काय? इराण म्हणतंय ८० ठार, ट्रम्प म्हणतात, ‘ऑल इज वेल’!


 

First Published on: January 8, 2020 4:16 PM
Exit mobile version