घरताज्या घडामोडीनक्की झालंय काय? इराण म्हणतंय ८० ठार, ट्रम्प म्हणतात, 'ऑल इज वेल'!

नक्की झालंय काय? इराण म्हणतंय ८० ठार, ट्रम्प म्हणतात, ‘ऑल इज वेल’!

Subscribe

इराणने अमेरिकी लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आता तिथे मृत्यूमुखी पडलेले अमेरिकी सैनिक आणि या एकूणच प्रकरणामध्ये अमेरिकेची भूमिका याभोवती गूढ निर्माण होऊ लागलं आहे.

इराणने अमेरिकेसोबत असलेल्या वादाला आज उघड स्वरूप देत इराणमधल्या अमेरिकी तळांवर हल्ला चढवला. तब्बल एक डझनहून अधिक बॅलेस्टिक मिसाईल इराणकडून डागण्यात आल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं. इराकच्या अबरिल, अल असद आणि ताजी या तीन लष्करी तळांवर हे मिसाईल डागण्यात आले. आता अमेरिका त्यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र, आपल्या सुरक्षा समितीसोबत चर्चा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑल इज वेल’, असं सांगणारं ट्वीट केल्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ट्रम्प यांच्या प्रकृतिनुसार आक्रमक भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा सगळ्यांनी केली होती. दरम्यान, क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामध्ये एकूण ८० अमेरिकी ठार झाल्याचा दावा इराणकडून करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

इराणमधील एका वृत्तवाहिनीने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये ८० जण मारले गेले आहेत. शिवाय, इराणने अमेरिकेसोबतच्या अण्वस्त्रबंदी करारातून आधीच माघार घेतल्यामुळे हा संघर्ष अधिक गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्वीटमुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले ट्रम्प?

इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून हल्ल्यावर आक्रमक पवित्रा घेतला जाण्याचा अंदाज बांधला जात होता. मात्र, ट्रम्प यांनी भलतंच ट्वीट केलं. ‘सारं काही ठीक आहे. इराणकडून इराकमधल्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागण्यात आली. या हल्ल्यामध्ये जीवितहानी तसेच वित्तहानी किती झाली, याची माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत सारंकाही ठीक चाललं आहे. जगातलं सर्वात आधुनिक आणि सामर्थ्यशाली तंत्रज्ञान आमच्या लष्कराकडे आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल मी उद्या निवेदन प्रसिद्ध करेन’, असं ट्रम्प म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता उद्या ट्रम्प काय भूमिका मांडणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा – आता युद्ध होणार? अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणनं डागली क्षेपणास्त्र!

अमेरिकेच्या भूमिकेवर संशय?

दरम्यान, या हल्ल्यानंतर देखील काही अभ्यासकांनी अमेरिकेच्या भूमिकेवर देखील संशय घेतला आहे. इराणने बॅलेस्टिक मिसाईलच डागले होते, हे अमेरिकेला इतक्या लगेच कसं समजलं? अशी शंका घेतली जात आहे. तसेच, अमेरिकेत सध्या ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण असून त्यांच्यावर महाभियोगाचा खटला देखील चालवण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या घटनांचा वापर ट्रम्प जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी करू शकतात, असा देखील अंदाज बांधला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -