हाँगकाँगमध्ये बेपत्ता मॉडेलचे शीर सूपाच्या भांड्यात, फ्रिजमध्ये मिळाले शरीराचे भाग

हाँगकाँगमध्ये बेपत्ता मॉडेलचे शीर सूपाच्या भांड्यात, फ्रिजमध्ये मिळाले शरीराचे भाग

नवी दिल्ली : नवी दिल्लीत घडलेल्या श्रद्धा मर्डर केस प्रमाणेच हाँगकाँगमध्येही २८ वर्षीय मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंझर एब्बी चोई हिची हत्या करण्यात आली आहे. गेल्या मंगळवारी (२१ फेब्रुवारी) बेपत्ता झालेल्या चोई हिच्या शरीराचे काही तुकडे दोन दिवसांनी शहराच्या ताई पो जिल्ह्यातील एका घरातील फ्रिजमध्ये सापडले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घरात विजेवर चालणारे कटर, मांस कापण्याचे मशीन आणि काही कपडे मिळाले. पण त्याठिकाणी तिचे शीर आणि हाथ गायब होते. न्यूयॉर्क पोस्ट या दैनिकाने म्हटले की, पोलिसांना तिचे हरवलेले शीर सुपाच्या मोठ्या भांड्यात सापडले. याव्यतिरिक्त मानवी अवशेष असलेले आणखी एक मोठे भांडेही पोलिसांनी जप्त केले.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधीक्षक अॅलन चुंग यांनी सांगितले की, भांड्यात सूप काठोकाठ भरलेले होते. मांसाचे तुकडे सुद्धा होते. ते मानवी अवशेष असतील, याची मला खात्री आहे. डोक्याबद्दल सांगायचे तर फक्त कवटी होती.
मॉडेलवर एका कारमध्ये हल्ला करण्यात आला आणि ती बेशुद्ध झाल्यावर तिला घरी नेण्यात आले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. फॉरेन्सिक तपासणीत मॉडेलच्या कवटीमागे एक भोक आढळले होते. जे प्राणघातक हल्ल्याचा पुरावा असू शकते. हाँगकाँग पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणात चार आरोपी आहेत. आधीचा पती अॅलेक्स क्वांग, त्याचे वडील क्वांग काऊ, त्याचा भाऊ अँथनी क्वांग यांचा समावेश असून चोईची सासू जेनीली हिच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. अॅलेक्सबरोबर ती विभक्त झाली होती.

हॉगकॉग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅलेक्स आणि त्याच्या कुटुंबाशी एक दशलक्ष हाँगकाँग डॉलर्सच्या आलिशान मालमत्तेवरून एब्बी चोईचा वाद होता. याप्रकरणी चौघांनाही सोमवारी (२७ फेब्रुवारी) न्यायालयात हजर करण्यात आले होते, मात्र त्यांना जामीन मिळाला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.

शेवटची सोशल मीडिया पोस्ट १९ फेब्रुवारीला
चोई एक प्रसिद्ध मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंझर होती. ती एले, वोग आणि हार्पर बाजारात दिसली होती. ती पॅरिस फॅशन वीकमध्येही नियमितपण हजेरी लावायची. तिने १९ फेब्रुवारीला शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली. त्यात तिने फॅशन पत्रिका L’Officiel मोनाकोसाठी फोटोशूट केले होते.

First Published on: March 1, 2023 11:57 AM
Exit mobile version