एम.जे.अकबरांमुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला – आप

एम.जे.अकबरांमुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला – आप

एम जे अकबर आणि प्रिया रमाणी

भारतात मीटू चळवळी मोठी होत असल्याचे पहायला मिळत आहे. या चळवळीमुळे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले. प्रिया रमानी या महिला पत्रकाराने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. दरम्यान एम जे अकबर यांनी हे आरोप फेटाळले होते. परंतु, आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आले. त्यानंतर आज आम आदमी पार्टीने असा आरोप केला आहे की, एम.जे.अकबरांमुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला. या प्रकरणामुळे भाजपचा महिलांप्रतीचा व्यवहार, त्यांचे चरित्र, आणि खरा चेहरा जगासमोर आला.

अकबर यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रवक्ते दिलीप पांडे म्हणाले की, अकबर यांचा राजीनामा पुरेसा नसून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. पांडे म्हणाले की, त्या २० महिलांच्या हिंमतीची दाद द्यायला हवी, ज्यांना अकबरांनी त्रास दिला होता. त्यानंतर आता अकबरांनी या संपूर्ण प्रकाराविरोधात आता न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यांच्यावरचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले तर आहेतच, परंतु त्यासोबतच संबंधित महिला पत्रकार-संपादिकेविरोधात मानहानीची याचिका देखील दाखल केली आहे. त्यामुळे आता अकबर यांनीच या महिलेविरोधात ‘MeToo नव्हेच’ असाच काहीसा पवित्रा अकबरांनी घेतला आहे.

 

 

First Published on: October 18, 2018 6:23 PM
Exit mobile version