मॉडर्नाची कोरोना लस ९४ टक्के यशस्वी; पण फैलाव थांबणार नाही!

मॉडर्नाची कोरोना लस ९४ टक्के यशस्वी; पण फैलाव थांबणार नाही!

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप सुरू असून कोरोनावरील लस कधी येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाट येणार अशी देखील चर्चा सुरु आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांत लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना अमेरिकन कंपनी मॉडर्नाने नुकतीच घोषणा केली होती. त्यानुसार कोरोना व्हायरसची लस ९४.५ टक्के प्रभावी ठरली आहे. ही जरी दिलासादायक बाब असली तरी मॉडर्ना कंपनीच्या तज्ज्ञांनी धक्कादायक दावा केला आहे.


Pfizer कंपनीचा दावा; ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी Corona लस


मॉडर्नाच्या प्रमुख तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीने लोकांना आजारी पडण्यापासून वाचवता येऊ शकतं. पण व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखता येणार नाही. मॉडर्नाचे प्रमुख तज्ज्ञ तल जक्स यांनी सांगितले की, ”व्यक्तीला कोरोना व्हायरसं संक्रमण झाल्यास लसीमुळे इतर व्यक्तींपर्यंत व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं. चाचणीदरम्यान याबाबत परिक्षण करण्यात आलेले नाही. ”

लस कोरोना झाल्याने आजारी पडण्यापासून वाचवेल की नाही याबाबत चाचणीतून माहिती मिळवणं सुरू आहे. चाचण्यांच्या माहितीद्वारे कळाले की, लस संक्रमित झाल्यानंतर व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. जास्तीत जास्त लसी या मॉडर्नाप्रमाणे तयार करण्यात आल्या आहेत. या लसी फक्त व्हायरसला नष्ट करत नाहीत तर व्हायरसला शरीरातील रिसेप्टर्सशी जोडण्यापासून रोखण्याचे काम करतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आजारी पडण्यापासून वाचतात, असे मॉडर्नाचे प्रमुख तज्ज्ञ तल जक्स यांनी सांगितले.

मॉडर्ना कंपनीने लसीची किंमत केली जाहीर

दरम्यान, आता अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने देखील लसीची किंमत जाहीर केली आहे. मॉडर्ना कंपनीने सांगितले आहे की, ‘सरकारकडून एका डोससाठी कंपनी १ हजार ८५४ पासून २ हजार ७४४ रुपये घेईल. तसेच किती प्रमाणात लसीची ऑर्डर दिली जाईल, त्याप्रमाणे किंमत ठरवली जाईल.’ याबाबत कंपनीचे सीईओ स्टीफन बँसेल यांनी दिली आहे.

स्टीफन बँसेल यांनी सांगितले की, ‘त्यांच्या लसीची किंमत फ्यू शॉटप्रमाणे असेल, ज्याची किंमत १० ते ५० डॉलर दरम्यान असेल.’ लसीच्या कोट्यावधी डोससाठी युरोपियन युनियनला मॉडर्नासोबत डील करायचे आहे. युरोपियन युनियनला हे डीलचे २५ डॉलर्सवर काम करायचे आहे. याबाबत कंपनीसोबत झालेल्या चर्चेत सामील असलेल्या युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

First Published on: November 25, 2020 7:28 PM
Exit mobile version