मोदी साडी, मोदी टी-शर्ट नंतर आता ‘मोदी टिकली’ बाजारात

मोदी साडी, मोदी टी-शर्ट नंतर आता ‘मोदी टिकली’ बाजारात

मोदी साडी, मोदी टी-शर्ट नंतर आता 'मोदी टिकली' बाजारात

भारतीय जनता पार्टी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या माध्यमांमार्फत प्रचार करत आहे. प्रचाराच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी बाजारात मोदी साडी आली होती. या साडीनंतर मोदी टी-शर्टही बाजारात आले होते. आता साडी आणि टी-शर्टनंतर मोदी टिकलीदेखील बाजार विक्रीला आली आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टिकल्यांचे पाकीट छापण्यात आले आहे. या टिकल्यांचे पॅकेट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लोकांनी केले नरेंद्र मोदींना ट्रोल

या मोदी टिकल्यांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नरेंद्र मोदींना ट्रोल केले जात आहे. मोदि टिकली म्हणून व्हायरल होणाऱ्या या फोटोवर एकीकडे मोदींचा फोटो आहे. तर दुसरीकडे भाजप पक्षाचं चिन्ह कमळ छापण्यात आलं आहे. हे टिकल्यांचे पाकिट पारस कंपनीचे आहे. या मोदी टिकलीवरुन राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी सोशल मीडियावर मोदींना प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

 

First Published on: March 29, 2019 3:03 PM
Exit mobile version