Modi Cabinet Expansion: मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांचा राजीनामा

Modi Cabinet Expansion: मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांचा राजीनामा

Modi Cabinet Expansion: मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळात आज, बुधवारी मोठा बदल होणार असून त्यापूर्वीच दिल्लीत राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रिमंडळात नवीन नावे जोडण्यापूर्वीच काही जुनी नावं निरोप देत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यासोबत कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी देखील राजीनामा दिला आहे.

यांनी दिला राजीनामा?

केंद्रीय शिक्षणमंत्री आणि कामगार मंत्री यांच्यासोबत खते व रसायन मंत्री सदानंद गौडा, महिला व बालकल्याण राज्यमंत्री देबोश्री चौधरी, शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी काल, मंगळवारी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे ते देखील मंत्रिमंडळातून आता बाहेर झाले आहेत.

माहितीनुसार, रमेश पोखरीयाल निशंक यांना प्रकृतीच्या कारणामुळे मंत्रिमंडळातून हटवले गेले आहे. कोरोना झाल्यापासून त्यांची तब्येत ठिक नव्हती, अशातच त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबोश्री चौधरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, असे समोर येत आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालचे काही नवे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात जागा घेतील, असे म्हटले जात आहे. तसेच महाराष्ट्राचे केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आज संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील डझनभर भाजप नेते दिल्ली दरबारी आहेत. २०२२च्या निवडणुकांआधी मोदी सरकारमध्ये मोठी उलथापालथ होत आहे.


हेही वाचा – राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद निश्चित? मोदींच्या निवासस्थानी दाखल


 

First Published on: July 7, 2021 2:36 PM
Exit mobile version