कोरोनासोबत लढण्यात मोदी सरकार अपयशी – संजय राऊत

कोरोनासोबत लढण्यात मोदी सरकार अपयशी – संजय राऊत

कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्रातील मोदी सरकार अपयशी झाल्याचा घणाघात शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय याचं अपयश हे केंद्र सरकारचं आहे. कारण केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनूसार राज्य सरकार काम करत आहे, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी ज्या राज्यात भाजपचं राज्य तिथून कोरोनानं काढता पाय घेतला, असा टोला देखील भाजपला लगावला.

तीन राज्यांमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य सरकार अपयशी झाल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव म्हणत असतील तर सर्वात आधी अपयश हे केंद्र सरकारचं आहे. कारण केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करत आहेत. या तिन्ही राज्यात भाजपचे सरकार नाही, तिथेच कोरोना आहे, असं म्हणणं मुर्खपणा आहे. महाराष्ट्राने आणि मुख्यमंत्री काम चांगले आहे. मुंबई, पुण्यात आणि नागपूरमध्ये बरेच बाहेर राज्यातील लोक येतात. महाराष्ट्राला जे औषध पाहिजे ते मिळत नाही पण गुजरातमध्ये भाजप कार्यलयात औषध मिळतात. हे निषेध करण्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी पण याचा निषेध केला पाहिजे.

जिथे भाजपचे CM आहेत तिथून कोरोना पळाला का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. राज्याला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू असल्याची टीका देखील राऊतांनी केली. केंद्रानं संवेदनशीलतेने वागलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

 

First Published on: April 12, 2021 10:52 AM
Exit mobile version