70 वर्षांनंतर भारतीय भूमीवर आलेले चित्ते मोदींनी सोडले मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये

भोपाळ – भारतातून 1952साली चित्ते नामशेष झाले होते. 70 वर्षांनंतर भारतात चित्ते आले आहेत. मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून 8 चित्ते आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज त्यांच्या हस्ते या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. चित्त्यांनी भारतात पाऊल ठेवल्यानंतरचे खास क्षण यावेळी पंतप्रधान नरेंद्री मीदींनी कॅमेऱ्यात टिपले.यावेळी त्यांनी आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक असल्याचे म्हंटले आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले –

हे दुर्दैव आहे की आपण 1952 मध्ये देशातून चित्ते नामशेष झाल्याचे घोषित केले. मात्र, अनेक दशकांपासून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणतेही अर्थपूर्ण प्रयत्न केले गेले नाहीत. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आता देशात नव्या ऊर्जेने चित्त्यांचे पुनर्वसन होऊ लागले आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण झाले की आपले भविष्यही सुरक्षित असते हे खरं आहे. विकासाचे आणि समृद्धीचे मार्गही खुले होतात. कुनो नॅशनल पार्कमध्ये जेव्हा चित्ते पुन्हा धावतील, तेव्हा येथील गवताळ प्रदेशाची परिसंस्था पुन्हा पूर्ववत होईल”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटले आहे.

पाच मादी व तीन नर चित्ते –

नामिबियातून भारतात आणल्या जाणाऱ्या 8 चित्त्यांमध्ये 5 मादी व 3 नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्त्यांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय ४.५ ते ५.५ वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (सीसीएफ) या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे.

 

First Published on: September 17, 2022 1:07 PM
Exit mobile version