Video: पहा, कसे केले मारूती ८०० कारचे तीन चाकी गाडीमध्ये रुपांतर

Video: पहा, कसे केले मारूती ८०० कारचे तीन चाकी गाडीमध्ये रुपांतर

देशातील सर्वात जुनी आणि नामांकीत मारूती सुझुकी कंपनीच्या मारूती ८०० कारचे आता तीन चाकी गाडीमध्ये रुपांतर झाले आहे. हा भन्नाट प्रयोग काही तरुणांनी केला असून त्याचा व्हिडिओ युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. एकेकाळी मारूती ८०० ही ग्राहकांनी पहिली पसंत बनली होती. या गाडीचे अनेक मॉडेल बनवण्यात आले. मात्र त्याचे तीन चाकी गाडीमध्ये रुपांतर करून नवीन लुक देण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. मॅग्नेटो ११ यांनी या कारचे मॉडिफिकेशन केले आहे. त्यांनी ही गाडी लहान आकारात बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच चार चाकीची तीन चाकी गाडी त्यांनी बनवली आहे. ही गाडी त्यांनी कशी मॉडिफाय केली, याचा संपूर्ण व्हि़डिओ त्यांनी युट्यूबवर शेअर करून दाखवला आहे. त्यामुळे ही गाडी तीन चाकी कशी झाली हे समजण्यास मदत होत आहे.

व्हिडिओ सौजन्य – मॅग्नेटो ११

अशी बनवली तीन चाकी गाडी 

ही कार बनवण्यासाठी संपूर्ण मारूती गाडीचे पुढील अर्धे भाग कापून टाकण्यात आले आहे. कारला मधोमध कापून वेगळे केले आहे. त्याच्या मागील भागात मोटरसायकलचे चाक बसवण्यात आले आहे. मारूती ८०० चे इंजिन हे पुढच्या भागात असल्याने त्याला मधोमध कापल्यामुळे वाहन चालवण्यास अडचण येणार नाही. हे रुपांतर केले खरे. परंतू हे बेकायदेशीर असून या प्रकरणी व्हिलर अॅक्टनुसार गाडीला जप्त केले जाऊ शकते. त्यांनी या गाडीची पूर्ण घडणच बदलून टाकली आहे. जे नियमांच्या विरोधात आहे. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, अजून गाडी पूर्णपणे तयार नसून यात आणखी काम होणे बाकी आहे. त्यामुळे या कारमध्ये अजून बदल केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास अमेरिका तयार – ट्रम्प

First Published on: May 27, 2020 10:32 PM
Exit mobile version