घरदेश-विदेशभारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास अमेरिका तयार - ट्रम्प

भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास अमेरिका तयार – ट्रम्प

Subscribe

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनमधील सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनमधील सीमा वादावर मध्यस्थी करण्यास तयारी दर्शवली आहे. आता लडाख प्रदेशात दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांपासून काहीशे मीटर अंतरावर तैनात आहेत आणि दोन्ही बाजूंकडून सैन्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे प्रकरण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे. मात्र, चीननेही बुधवारी आपल्या स्थितीत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या सीमेवरील तणाव स्थिर आणि नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. “आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही माहिती दिली आहे, त्यांना गरज असल्यास अमेरिका सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार आहे.” भारत आणि चीनमधील सीमा वादावर अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाने प्रथमच भाष्य केलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा – नेपाळची माघार, भारताचा काही भाग नकाशावर दाखविण्याचा प्रस्ताव मागे

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंतप्रधान कार्यालयातही या विषयावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी लडाख प्रकरणावर संपूर्ण अहवाल घेतला, त्याशिवाय तीन लष्करप्रमुखांना पर्याय सुचवायला सांगितले. या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील उपस्थित होते. या दरम्यान या विषयावर लष्करप्रमुख, सीडीएस कडून ब्लू प्रिंट मागितली गेला. पंतप्रधान मोदींच्या बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची या विषयावर बैठक झाली आणि लडाख सीमेवर भारत आपल्या रस्त्याचे बांधकाम थांबवणार नाही असा निर्णय घेण्यात आला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -