स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग; कोरोना रुग्णांना मृत्यूनंतरही भोगाव्या लागताय नरक यातना

स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग; कोरोना रुग्णांना मृत्यूनंतरही भोगाव्या लागताय नरक यातना

स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग; कोरोना रुग्णांना मृत्यूनंतरही भोगाव्या लागताय नरक यातना

देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज देशात लाखो रुग्ण आढळून येत असून चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाची ही दुसरी लाट अति गंभीर असल्याचे बोले जात आहे. कारण याचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होत असून मृत्यू दर देखील अधिक आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत अनेकांनाचे प्राण वाचवणे देखील फार कठीण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. बरेच नातेवाईक मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह ही घेऊन जात नाही. त्यामुळे बरेच मृतदेह रुग्णालयातच पडून राहतात. दरम्यान, सूरतमध्ये तर कोरोनाच्या मृतदेहावर आणि नॉन कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अक्षरश: लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत आहेत. तर काही जण मृतदेहावर लवकर अंत्यसंस्कार करुन घ्यायचे असल्यास पैसे द्या, अशी देखील मागणी करत आहे. त्यामुळे सध्या देशात कोरोनाचे भयंकर रुप पाहायला मिळत आहे.

गुजरातमध्येही कोरोनाचा कहर

कोरोनाचा कहर हा केवळ महाराष्ट्र राज्यातच नाही तर गुजरातमध्ये देखील पाहायला मिळत आहे. गुजरातच्या सूरतमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. याठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर अक्षरश: मृतदेहांचे ढीग पाहायला मिळतात. तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. त्याठिकाणी मृतदेहाच्या नातेवाईकांना टोकन दिले जाते. त्या टोकननुसार नंबर आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. तोपर्यंत तात्काळत स्मशानभूमी बाहेर बसावे लागते.

पैसे घेऊन केले जातात लवकर अंत्यसंस्कार

गुजरातमधील एका स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकर अंत्यसंस्कार करण्याचे प्रकरण समोर आले आहे. एखाद्या मृतदेहावर तात्काळ अंत्यसंस्कार करायचे असल्यास त्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडून दीड ते दोन हजार घेतले जातात. त्यामुळे काही नातेवाईक पैसे देऊन अंत्यसंस्कार करुन घेतात. त्यामुळे आधी आलेले नागरिक त्याठिकाणीच तात्कळत बसतात. सामाजिक कार्यकर्ता हरिश गुज्जर हे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासठी गेले होते. त्या दरम्यान, त्यांनी हा धक्कादायक प्रकार पाहिला. त्यामुळे आता पुढील काही दिवसात कोरोनाचे अजून कोणते रुप पाहायला मिळणार, अशी भिती नागरिकांच्या मनात आहे.


हेही वाचा – रेल्वे डब्ब्यांचे झाले आयसोलेशन कोच; राज्यासाठी १७६ कोच रेल्वे मंत्रालयाकडून उपलब्ध


 

First Published on: April 12, 2021 9:58 AM
Exit mobile version