Video : माकडाने पळवले रुग्णाच्या रक्ताचे नमुने, कोरोनाच्या फैलावाची भिती

Video : माकडाने पळवले रुग्णाच्या रक्ताचे नमुने, कोरोनाच्या फैलावाची भिती

माकडाने चावले रुग्णाच्या रक्ताचे नमुने

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक अजब घटना घडली आहे. मेरठमधील मेडिकल कॉलेजच्या लॅबमध्ये एका माकडाने शिरकाव करुन गोंधळ घातला. या माकडाने कोरोनाच्या लॅबमध्ये प्रवेश करुन लॅब टेक्निशियनच्या हातात असलेले रक्ताचे नमुने घेऊन धूम ठोकली आहे. त्या माकडाच्या हातातील नमुने घेण्यासाठी टेक्निशियने त्या माकडाचा पाठलाग केला. मात्र, माकड झाडावर जाऊन बसला. या संपूर्ण घटनेचा टेक्निशियने व्हिडीओ काढला. मात्र, यामुळे टेक्निशियनला मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णाच्या रक्ताचे नमुने असल्याचे बोले जात होते. मात्र, आता मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून याला विरोध केला जात आहे.

रक्ताच्या नमुन्याचे सील तोडले

मिळालेल्या माहितीनुसार; कोरोना रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मेरठच्या एलएलआरएम लॅबमध्ये नेण्यात येतात. त्याच लॅबमधून माकडाने टेक्निशियनच्या हातातील सॅम्पल घेऊन पळ काढल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या माकडाकडून ते सॅम्पल मिळवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्या माकडाने रक्ताच्या नमुन्याचे सील तोडले आणि चावण्यास सुरुवात केली. दरम्यान, या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. मात्र, त्या आधीच माकडाने पळ काढला.

कोरोनाचा संसर्ग परसण्याची भीती

माकड पळाल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांचे म्हणणे आहे की, ‘या माकडाने रक्ताच्या नमुन्याचे सील तोडले आहे. त्यामुळे या माकडामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती आहे. तसेच या माकडाला ओळखणे वनविभागाला कठीण जाणार आहे.

कोरोना रुग्णाच्या रक्ताचे नमुने नव्हते

मेरठ मेडिकल कॉलेजच्या मुख्यध्यापकांनी याबाबत सांगितले आहे की, माकडाने जे सॅम्पल पळवले आहे, ते कोरोना रुग्णाचे नव्हते. ते एका सामान्य नागरिकाचे होते.


हेही वाचा – कुत्र्याने ३ महिने बघितली हॉस्पिटलच्या बाहेर मालकाची वाट पण…


First Published on: May 29, 2020 5:59 PM
Exit mobile version