माकडांमुळे माणसावरील कोरोनाची लस येण्यास उशीर; वाचा सविस्तर रिपोर्ट!

माकडांमुळे माणसावरील कोरोनाची लस येण्यास उशीर; वाचा सविस्तर रिपोर्ट!

माकडांच्या कमतरेतमुळे कोरोनाची लस लांबणीवर

सध्या जगभरात कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरू आहे. लसीचा पहिला प्रयोग हा माकडांवर केला जातो. पण सध्या अमेरिकेत माकडांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसवर लस तयार होण्यास विलंब होऊ शकतो असा इशारा अमेरिकन संशोधकांनी दिला आहे. अटलांटिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अमेरिकेत माकडांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनावर लस येण्यास विलंब होऊ शकतो असे म्हटले आहे.

या मासिकात दिलेल्या अहवालानुसार कोरोना व्हायरसवर लसीच्या संशोधनासाठी वापरल्या जाणार्‍या प्राण्यांचा म्हणजेच माकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यूएस नॅशनल प्राइमेट रिसर्च सेंटरच्या मते, Rhesus प्रजातीतील माकडांचा वापर औषधांच्या संशोधनासाठी केला जातो.

माकडांवर कोरोनाच्या लसीचा प्रयोग

कॅलिफोर्नियाच्या नॅशनल प्राइमेट रिसर्च सेंटरच्या कोईन व्हॅन रोम्पे यांनी सांगितले की राष्ट्रीय स्तरावर माकडांची मोठी कमतरता आहे. बायोक्वाल या संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क लुईस म्हणाले की आम्हाला आता रेसस वानर मिळत नाहीत. ते पूर्णपणे अदृश्य झाले आहेत.

वृत्तानुसार कोरोना महामारीमुळे माकडांची मागणी वाढली आहे, परंतु चीनकडून आत माकडांचा पुरवठा होत नाही. मागील वर्षी अमेरिकेत आयात केलेल्या ३५ हजार  माकडांपैकी ६० टक्के माकडे चीनमधून पाठविण्यात आले होते. पण कोरोना विषाणूमुळे चीनने माकडांची निर्यात बंद केली.

माकडांना कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी विशेष प्रकारचे एनिमल बायोसॅफ्टी लेव्हल -3 लॅब आवश्यक आहे. यूएस मध्ये अशा लॅबची संख्या मर्यादित आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी माकडे खूप उपयुक्त आहेत कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती माणसांइतकीच आहे. त्यामुळे आता माकडांची कमतरता निर्माण झाल्यामुळे कोरोनावर लस येण्यास विलंब लागू शकतो.


हे ही वाचा – महाराष्ट्र सोडून संपुर्ण देशात ७ सप्टेंबरपासून मेट्रो सुरु होणार


First Published on: September 2, 2020 7:59 PM
Exit mobile version