नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 81 चिनी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 81 चिनी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने 81 चिनी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस बजावल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे. तसेच 117 चिनी नागरिकांना देशातून हद्दपार केले आहे.

संसदेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले की, 2019 ते 2021 या कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 81 चिनी नागरिकांना देश सोडण्याची नोटीस बजावली आहे. तर 117 चिनी नागरिकांना भारतातून हद्दपार केले आहे. याशिवाय व्हिसा अटींचे उल्लंघन आणि इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 726 परदेशी नागरिकांना प्रतिकूल यादीत ठेवले आहे. सरकारने अशा परदेशी नागरिकांचे रेकॉर्ड ठेवले आहे. यामध्ये सर्वाधिक चिनी नागरिकांचा समावेश आहे. ज्यांनी वैध कागदपत्रांसह देशात प्रवेश केला.

भारतात नोकरी, पर्यटन आणि इतर अनेक कामांसाठी परदेशी नागरिक येतात. यातील बहुतांश नागरिक व्हिसा नियमांचे आणि इतर बेकायदेशीर कृत्यांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले, या परदेशी नागरिकांना केंद्राकडून नोटीस पाठवली त्यानंतर त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली, भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या अनेक परदेशी नागरिकांना केंद्र सरकारकडून कारवाईची नोटीस पाठवली जाते.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात विदेशी अधिनियम 1946 नुसार कारवाई केली जाईल, ज्यात परदेशी नागरिकांना देश सोडण्याची नोटीस जारी करत व्हिझा शुल्क आकारणे यांसारख्या कारवाईचा समावेश आहे.


अल कायदाचा प्रमुख अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार; भारताला आधीच होती हल्ल्याची पूर्वकल्पना?

First Published on: August 2, 2022 9:39 PM
Exit mobile version