घरदेश-विदेशअल कायदाचा प्रमुख अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार; भारताला आधीच होती हल्ल्याची पूर्वकल्पना?

अल कायदाचा प्रमुख अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार; भारताला आधीच होती हल्ल्याची पूर्वकल्पना?

Subscribe

अल कायदा प्रमुख अल जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. या कारवाईमुळे दहशतवादाविरोधात अमेरिकेला मोठे यश मिळाले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भारताला अमेरिकेच्या या ऑपरेशनपूर्वी हल्ल्याची पूर्वकल्पना होती. 31 जुलैपासून या हल्ल्याबाबत भारताला माहिती होती. माक्प मात्र भारत अमेरिकेकडून औपचारिक घोषणेच्या प्रतिक्षेत होता.

दरम्यान अल कायदा प्रमुख अल जवाहिरीच्या मृत्यूवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 1 ऑगस्ट रोजी भाष्य केले होते. अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी रविवारी सकाळी 6.18 वाजता अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला. एका भाषणादरम्यान बायडेन म्हणाले की, आता खरा न्याय झाला आहे आणि हा दहशतवादी आता जिवंत राहिलेला नाही.

- Advertisement -

मात्र अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इंटेलिजन्स कम्युनिटीच्या सदस्यांना शाबासकी दिली आहे. तसेच जवाहिरीच्या मृत्यूनंतर 9/11 वाचलेल्यांच्या कुटुंबांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे आभार मानले आहेत. न्याय आणि उत्तरदायित्वासाठी त्यांच्या वर्षानुवर्षे चाललेल्या लढ्यातील हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

कोण आहे अल जवाहिरी?

11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यामागील सूत्रधार ओसामा बिन लादेनचा उजवा हात म्हणून अयमान अल-जवाहिरीला ओळखले जाते. ओसामा बिन लादेनला CIA नेव्ही सीलने 2011 मध्ये पाकिस्तानातील एकताबाद येथे ठार मारले. यावेळी 71 वर्षीय ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल-जवाहिरी हा अल-कायदाचा नवा म्होरत्या म्हणून निवड करण्यात आली.

- Advertisement -

इजिप्तमध्ये जन्मलेला अल-जवाहिरी पेशाने एक डॉक्टर आणि सर्जन आहे. तसेच तो लादेनचा वैयक्तिक चिकित्सक होता. इजिप्तचे सरकार उलथून टाकण्यासाठी अल-जवाहिरीला तेथे इस्लामिक जिहादचा सदस्य म्हणून दोनदा तुरुंगात टाकण्यात आले. त्याच्यावर USD 25 मिलियनचे इनाम होते. अल-जवाहिरी 1980 च्या दशकात इजिप्तमधून पेशावरला पळून गेला. तो कुख्यात दहशतवादी संघटना अल-कायदाचा प्रमुख सदस्य होता, ज्याने जिहादचे रूपांतर अमेरिकेला लक्ष्य करण्याच्या चळवळीत केले.

मात्र लादेननंतर अमेरिकेसाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अल जवाहिरी याचाही ड्रोन हल्ल्यात खात्मा करण्यात अमेरिकेला यश मिळाले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी ठार झाला आहे. जवाहिरीच्या मृत्यूमुळे आता अमेरिकेलेला अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेला सर्वात मोठं यश मिळाले आहे.


पीएम नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सोशल मीडिया अकाऊंटचे बदलले डीपी, जाणून घ्या कारण?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -