Monsoon Update: ‘या’ राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Monsoon Update: ‘या’ राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून देशातील सर्वच राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्र(maharashtra) आणि गुजरात(gujrat) राज्यात पावसाच्या जोरदार तडाख्याने पूरपरिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे. आणि त्यात अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. अशातच भारतीय हवामान खात्याने सोमवारी ट्विट करून देशातील अनेक राज्यांत पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने ट्विट केले त्यानुसार २५ ते २९ जुलै दरम्यान पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश(arunachal pradesh), मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यातही विशेषतः २५,२८, आणि २९ जुलै रोजी आसाम आणि मेघालय तर २८,२९ जुलै रोजी अरुणाचल प्रदेश मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हे ही वाचा – चौपाट्यांवरील सुरक्षेत वाढ, लाइफ गार्डच्या सोबतीला आणखी ४० जवान तैनात

२५ जुलैपासून पुढील चार दिवस राजस्थानमध्ये(rajasthan) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मान्सून ट्रफ लाइन उत्तरेकडील भागात सरकेल आणि २७ जुलैपासून देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २४ ते २६ जुलै या कालावधीत गुजरात, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश राज्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोब महाराष्ट्रत कोकण(maharshtra, kokan) भागात आणि त्यालगच्या घाट असलेल्या भागात २७ नई २८ जुलै दरम्यान पावसाचा इशारा दिला आहे. तर 28 जुलै रोजी पंजाबमध्ये सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने ट्विट केले आहे की, 26 जुलै रोजी म्हणजेच आज चरखी दादरी, मत्तानहेल, झज्जर (हरियाणा) आणि परिसरात ढगांच्या गडगडाटांसह मध्यम तीव्रतेचा पाऊस पडू शकतो.

हे ही वाचा – राजकीय संघर्षात गुदमरल्या…विद्यार्थी संघटना !

दरम्यान देशाची राजधानी दिल्ली(dehli) मध्ये सुद्धा काही भागात पश्चिम विहार, राजौरी गार्डन, पंजाबी बाग, पटेल नगर आणि राष्ट्रपती भवन या भागात मध्यम ते मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा दिलेला देण्यात आलेला इशारा आता मागे घेण्यात आला आहे.

हा ही वाचा –  पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवरून आम आदमी पक्षाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

First Published on: July 26, 2022 8:31 AM
Exit mobile version