नोकरदारांसाठी खुशखबर! यंदा पगारात 10 टक्क्यांपेक्षा अधिक पटीने होणार वाढ

नोकरदारांसाठी खुशखबर! यंदा पगारात 10 टक्क्यांपेक्षा अधिक पटीने होणार वाढ

नोकरदारांसाठी खुशखबर! यंदा पगारात 10 टक्क्यांपेक्षा अधिक पटीने होणार वाढ

नोकरदार वर्गासाठी 2022 हे वर्ष सर्वाधिक खास असणार आहे. कारण यावर्षी अनेक कंपन्यांनी पगारात 10 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे आता पगार कपात झालेल्या आणि नुकसान झालेल्या पगारदार वर्गाला दिलासा मिळणार आहे. तसेच ही पगार वाढ झाल्यास कोरोनाच्या आधीच्या पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.

कॉर्न फेरी इंडियाने आपल्या वार्षिक सर्वे रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये सरासरी पगार वाढ 9.4 टक्के असण्याचा अंदाज आहे. तर 2021 मध्ये हीच सरासरी वाढ 8.4 टक्के होती. एवढेच नाही तर 2019 या कोरोना काळात पगारात सरासरी 9.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. या सर्वेत बहुतांश व्यावसायिकांनी या वर्षी व्यवसायावर महामारीचा फारसा परिणाम दिसणार नसल्याचे सांगितले आहे. यामुळे कंपन्यांना त्यांचा नफा वाढण्यासही मदत होईल.

कंपन्यांनी गेल्या काही तिमाहीत मोठ्याप्रमाणात फायदा झाल्याचे निकाल जाहीर केले आहेत. पगार वाढ ही मुख्यत्वे व्यवसायाची कामगिरी, उद्योग मेट्रिक्स आणि बेंचमार्किंग ट्रेंड्सवर अवलंबून असते. याशिवाय कंपन्यांना टॅलेंटला आपल्यात गुंतवूण ठेवण्यासाठीही पगारात मोठी वाढ करण्याची घोषणा करतात. या सर्वेमध्ये असे दिसून आले की, 40 टक्के कर्मचारी नव्या नोकरीच्या शोधत आहेत.

टेक कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या पगारात यावर्षी 10.5 टक्के आणि कंज्यूमर क्षेत्रात 10.1 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानंतर लाइफ सायन्समध्ये 9.5 टक्के, सर्व्हिस, ऑटो आणि केमिकल कंपन्यांमध्ये 9 टक्क्यांपर्यंत पगार वाढू शकतो. सर्वेक्षण केलेल्या 786 कंपन्यांपैकी 60 टक्के कंपन्यांनी सांगितले की, ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाय-फाय कव्हरेज भत्ता देणार आहेत. केवळ 10 टक्के कंपन्यांनी प्रवास भत्ता कमी किंवा रद्द केल्याचे सांगितले.


Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घसरण; आज 1,312 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू


First Published on: January 28, 2022 8:45 PM
Exit mobile version