घरCORONA UPDATEMumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घसरण; आज 1,312 नवे रुग्ण,...

Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घसरण; आज 1,312 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

Subscribe

सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या कमी होऊन 20 झाली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठी घसरण होत असल्याचे दिसून आले आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून 1500 हून कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 4900 वर आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही कुठेतरी दिलासाजनक बाब आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 1312 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याशिवाय 4,990 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

यात आज सापडलेल्या रुग्णांपैकी 1,089 (83 टक्के) रुग्णांनी कोणतीच लक्षणे नाहीत. तर नवीन रुग्णांपैकी 193 रुग्णांना रुग्णालयात (Mumbai corona update) दाखल करण्यात आले. यापैकी 41 रुग्ण हे ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

- Advertisement -

मुंबईतील आत्तापर्यंत 1,043,059 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (corona new patients decreases today also in mumbai) तर त्यातील 7,29,553 रुग्ण लक्षणे विरहित होते. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर पोहचला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.27 टक्के पर्यंत खाली आला आहे.

- Advertisement -

तर रुग्ण दुपटीचा दर ही 259 दिवसांपर्यंत वाढला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांचा आकडा ही कमी होऊन 14,344 पर्यंत कमी झाला आहे. मुंबईत आज 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 16,591 वर पोहचला आहे. आज 27,720 चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 1,51,57,551 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत 1,009,374 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या कमी होऊन 20 झाली आहे.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या

राज्यात आज 24,947 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.86 टक्के एवढा झाला आहे. आज 45,648 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.61 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,61,370 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 2,66,586 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 76,55,554 झाली आहे. यात राज्यात आज 110 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण पुण्यातील आहेत.


Budget 2022 on App : आता इंग्रजीबरोबर हिंदीतही वाचता येणार अर्थसंकल्प; केंद्राने लाँच केलं अ‍ॅप


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -