Bomb Threat Airplane: मॉस्को-गोवा विमानाला बॉम्बनं उडवण्याची धमकी, विमान उझबेकिस्तानकडे वळवले

Bomb Threat Airplane: मॉस्को-गोवा विमानाला बॉम्बनं उडवण्याची धमकी, विमान उझबेकिस्तानकडे वळवले

पणजी : मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली असून, त्यानंतर विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाची राजधानी मॉस्को येथून 240 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या गोवा चार्टर्ड विमानाला शनिवारी पहाटे बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली. यानंतर विमान उझबेकिस्तानच्या दिशेने वळवण्यात आले. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

गोव्यात उतरण्यापूर्वी विमान वळवले
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, विमान पहाटे 4.15 वाजता दक्षिण गोव्यातील दाबोलिम विमानतळावर उतरणार होते. अझूर एअरने चालवलेले विमान (AZV2463) भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी वळवण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, दाबोलिम विमानतळाच्या संचालकांना रात्री 12.30 वाजता विमानात बॉम्ब ठेवल्याबद्दल ई-मेल प्राप्त झाला, त्यानंतर विमानाचा मार्ग वळवण्यात आला.


मॉस्को-गोवा विमानाचे जामनगर येथे लँडिंग
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा गेल्या आठवड्यात मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती, त्यानंतर मॉस्को-गोवा विमानाचे गुजरातमधील जामनगर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.


हेही वाचाः ब्रिजभूषण सिंह यांना पदावरून हटवले; कुस्तीपटूंचे आंदोलन मागे

First Published on: January 21, 2023 12:03 PM
Exit mobile version