Omicron Variant: दिलासादायक! अमेरिकेतील ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे – सीडीसी

Omicron Variant: दिलासादायक! अमेरिकेतील ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे – सीडीसी

अमेरिकेत आतापर्यंत ४० हून अधिक लोकांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आढळला आहे. यामधील तीन चतुर्थांशपेक्षा अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. दिलासादायक बाब म्हणजे जवळपास सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC) दिली आहे.

सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल वालेंस्की म्हणाले की, ओमिक्रॉनबाधितांचे आकडे कमी असले तरी कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट अमेरिकेला कशा प्रकारे प्रभावित करेल, याचा तपास घेतला जात आहे. तसेच आतापर्यंत आढळलेल्या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. प्रमुख लक्षणांमध्ये खोकला, छातीत दुखणे आणि थकव्यासारखी लक्षणे आहेत. यामुळे कोणाचाही मृत्यू होईल असा इशारा नाही.

ओमिक्रॉनचा फैलाव ५७ देशांमध्ये…

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. त्यानंतर या नव्या व्हेरिएंटचे ५७ देशांमध्ये रुग्ण आढळले. अमेरिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण १ डिसेंबरला आढळला होता. बुधवारी दुपारपर्यंत सीडीसीने १९ राज्यातील ४३ ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद केली आहे. ज्यामध्ये सुमारे एक तृतीयांश लोकांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. तसेच या रुग्णांमधील एक तृतीयांश लोकांनी बूस्टर डोसही घेतला आहे.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणाले की, ज्याप्रकारे जगभरात ओमिक्रॉन पसरत आहे, हे लक्षात घेता महामारीवर याचा व्यापक प्रभाव पडले. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढण्यापूर्वी याला रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची वेळ आली आहे. त्यांनी सर्व देशांना चाचणी आणि जीनोम सिक्वेंसिंगमध्ये वाढ करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा – Booster Dose : Covid-19 विरोधी लसीचा बुस्टर डोस कोणाला द्यावा, WHO ने मांडले मत


First Published on: December 10, 2021 1:39 PM
Exit mobile version