घरताज्या घडामोडीBooster Dose : Covid-19 विरोधी लसीचा बुस्टर डोस कोणाला द्यावा, WHO ने...

Booster Dose : Covid-19 विरोधी लसीचा बुस्टर डोस कोणाला द्यावा, WHO ने मांडले मत

Subscribe

जिनिव्हा : जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या एडव्हायजरी पॅनेलने कोरोनाविरोधी (Covid-19) बुस्टर डोसच्या निमित्ताने काही सूचना केल्या आहेत. हा बुस्टर डोस कोणाला देण्यात यावा यासाठीचा सल्ला डब्ल्यूएचओने दिला आहे. त्यामध्ये ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे तसेच लसीचा डोस न मिळालेल्या (३ ते १७ वयोगटाच्या) इनअॅक्टिव्हेटेड व्यक्तींना बुस्टर डोस देण्याची शिफारस डब्ल्यूएचओने केली आहे. गुरूवारी डब्ल्यूएचओने काही शिफारशी आणि सूचना केल्या आहेत.

अनेक देशांनी बुस्टर डोस देण्यासाठी सुरूवात केली आहे. त्यामध्ये प्रौढ नागरिक आणि सहव्याआधी असणाऱ्या नागरिकांना हे बुस्टर डोस देण्यात येत आहेत. पण ओमिक्रॉनच्या व्हेरीएंटमुळे अनेक देशांपुढे बुस्टर डोस देण्याचे आव्हान आता चिंतेत भर घालणार आहे. कारण मोठ्या लोकसंख्येला बुस्टर डोस देण्यासाठी अनेक देशांची दमछाक होताना पहायला मिळत आहे.

- Advertisement -

अनेक विकसनशील देशांमध्ये लसीकरणाचा वेग हा अत्यंत मंदावलेला आहे. काही देशांमध्ये सुरूवातीचे डोस उपलब्ध झाले नाही. अशावेळी बुस्टर डोसएवजी या प्राथमिक डोसला प्राधान्य असायला हवे असे मत डब्ल्यूएचओने मांडले आहे. डब्ल्यूएचओच्या एलेजॅंड्रो क्रॅविटो यांनी आपत्कालीन उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट केले आहे की, कोरोनाच्या लसीची परिणामकता ही दिसून आली आहे. परिणामी जेष्ठ नागरिकांवर होणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामध्ये घट दिसून आली आहे.

सहा महिन्यात कोरोनाच्या लसींमुळेच गेल्या काही महिन्यात परिणामकता दिसून आल्याने चांगले सुरक्षा कवच निर्माण झाले आहे. त्यामध्ये सहा महिन्यानंतरही ही परिणामकारकता दिसून आली आहे. काही ठिकाणी या परिणामकारकतेमध्ये घट झालेली आहे, असे मत डब्ल्यूएचओचे लसीकरण विभागाचे संचालक केट ओब्रेयन यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

जॉन्सन एण्ड जॉन्सनचा सिंगल डोस हा परिणामकारक आहे. पण कंपनीच्या क्लिनिकल ट्राएलचा डेटा सांगतो की दोन डोसमुळे लसीची परिणामकारकता अधिक वाढते. त्यामुळेच अधिक प्रमाणाता लसीकरण होणे गरजेचे असल्याचेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

इनएक्टिव्हेटेड लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेक, सिनोफार्म आणि भारत बायोटेकचा समावेश आहे. त्यामध्ये केमिकल, हिट आणि रेडिएशनच्या माध्यमातून SARS-CoV-2 व्हायरस हा निष्क्रिय केला जातो किंवा मारला जातो.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -