हे लिप्स आर्ट ठरले जगातील सर्वात महाग आर्ट

हे लिप्स आर्ट ठरले जगातील सर्वात महाग आर्ट

जगातील सर्वात महागडे लिप्स आर्ट (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

सध्या नेल आणि लिप्स आर्टचे फॅशन तरुणांमध्ये अधिक प्रमाणात आहे. नखांना आणि ओठांना विविध रंगाने रंगवून त्यावर डिझाइन काढण्याला आर्ट म्हणतात. या आर्टमधून ही विश्व रेकॉर्ड बनववता येतो याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. लिप्स आर्टच्या माध्यमातून विश्वरेकॉर्ड बनवण्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. रोझेंडॉर्फ या डायमंड कंपनीने हा रेकॉर्ड केला आहे. आपल्या कंपनीला ५० हून अधिक वर्ष पूर्ण झाले म्हणून हा रेकॉर्ड बणवण्यात आला आहे. ओठांना हिऱ्यांनी सजवून हा रेकॉर्ड नोंदवण्यात आला. हे आर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

काय बनवला रेकॉर्ड

लिप्स आर्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फॅशनमधून कंपनीच्या हिऱ्यांना प्रमोट करण्यात आले. ओठांना ब्लॅक लिप्सस्टिक लावून तब्बल १२६ हिरे लावण्यात आले आहेत. या हिऱ्यांचि किंमत ३.७८ कोटी (५,४०,८५८.५९ डॉलर्स) असल्याचे सांगण्यात आले आहे. हे हिरे २२.९२ कॅरेटचे आहेत. मेकअप आर्टिस्ट क्लेअर मॅक यांनी हे आर्ट तयार केले आहे. आतापर्यंत लिस्पस्टिक मध्ये अनेकदा हिऱ्याचा वापर करण्यात आला होता मात्र पहिल्यांदाच एकाच वेळी १२६ हिऱ्यांचा वापर केल्या गेला आहे.

First Published on: January 8, 2019 9:58 PM
Exit mobile version