कुवेतहून आलेल्या २४ भारतीयांना कोरोनाची लागण; पासपोर्ट तपासणी करणारे CISF जवान क्वारंटाईन

कुवेतहून आलेल्या २४ भारतीयांना कोरोनाची लागण; पासपोर्ट तपासणी करणारे CISF जवान क्वारंटाईन

कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यामुळे कुवेतमध्ये अडकलेल्या १३४ भारतीयांनी बुधवारी १३ मे रोजी इंदूर गाठले. या १३४ भारतीयांपैकी २४ लोकांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान इंदूरला पोहोचल्यानंतर लष्कराच्या ईएमई सेंटरमध्ये प्रत्येकाला क्वारंटाईन करण्यात आले. शनिवारी १८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता तर रविवारी आणखी ६ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, यामुळे तेथील कोरोनाबाधितांची संख्या २४ वर पोहोचली आहे.

मध्यप्रदेशमध्ये रविवारी कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने १८७ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे संपुर्ण राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४ हजार ९७७ वर पोहोचला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात या आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २४८ वर पोहोचला आहे. मध्य प्रदेशच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत भोपाळमध्ये ३ आणि इंदूर व बुरहानपुर येथे प्रत्येकी एकाचा राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

तसेच अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची लागण होण्याचे सर्वाधिक ९२ नवे रुग्ण आढळले आहेत. भोपाळमध्ये ३८, उज्जैनमध्ये ३३, ग्वाल्हेरमध्ये १० आणि देवासमध्ये चार नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून इंदूरमध्ये २ हजार ४७० पर्यंत पोहोचली आहे, तर भोपाळमध्ये ९९२, उज्जैनमध्ये ३२९, जबलपूरमध्ये १७५, खारगोनमध्ये ९९, धारमध्ये ९६, रायसेनमध्ये ६५, खंडवामध्ये ९६, बुरहानपूरमध्ये १४९ मंदसौरमध्ये ६०. देवासात, होशंगाबादमध्ये ३७, नीमचमध्ये ५०, ग्वालियरमध्ये ५८, बाडवानी व मुरैनामध्ये २९-२९. आणि रतलाममध्ये २८ जण कोरोनाने संक्रमित झाले आहेत.


लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात होते ६०६ रुग्ण, तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या ९० हजार!
First Published on: May 18, 2020 12:02 PM
Exit mobile version