Operation Muskaan : शाळेत असताना घर सोडलेला मुलगा मुंबईत सापडला; आता कमवितो लाखो रुपये; वाचा सविस्तर

Operation Muskaan : शाळेत असताना घर सोडलेला मुलगा मुंबईत सापडला; आता कमवितो लाखो रुपये; वाचा सविस्तर

लखनऊ : आई-वडील सतत अभ्यास कर म्हणून सांगणाऱ्या मुलाने घर सोडले. तब्बल सहा वर्षानंतर मुलगा मुंबईत सापडला. अभ्यास न करणारा हाच मुलगा आता उच्च शिक्षित झाला असून त्यांची महिन्याची कमाई लाखाच्या घरात आहे. हरवलेल्या मुलाला पाहून आई-वडिलांचे डोळे पाणावले.

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये राहणारा आशु राजपूत 2018 मध्ये हा इयत्ता दहावीत शिकत असताना. आशुचे आई-वडिल त्याला सतत अभ्यास करणायला सांगत होते. पण आशुला अभ्यासात रस नसल्यामुळे त्यांचे वडील महेंद्र यांनी त्याला मारायचे. यामुळेच आशुने सप्टेंबर 2018 घर सोडून पळून गेला. यानंतर आशुच्या आई-वडिलांनी त्यांचा शोध घेतला. यानंतर आई-वडिलांनी ग्वाल्हेरच्या हजीरा पोलीस ठाण्यात आशुच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आशुचा शोध घेऊनही तो सापडला नाही.

नुकतेच ‘ऑपरेशन मुस्कान’च्या अंतर्गत आशुची फाईल पोलिसांनी पुन्हा उघडली आणि त्यांचा शोध सुरू केला. यावेळी पोलिसांच्या लक्षात आले की, आशुचा आधार कार्डवरील मोबाईल सिम कार्ड सुरू असल्याचे कळाले. यानंतर पोलिसांनी आशुचे सिम ट्रेस करत मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी आशुला शोधून काढण्यात यश आले. आता आशु हा सुशिक्षि असून त्यांची महिन्याची कमाई ही लाखांच्या घरात आहे. पोलीस आशुला त्यांच्या ग्वाल्हेरला घेऊन गेले आणि त्यांच्या आई-वडिलांशी भेट घालून दिली. तब्बल सहा वर्षानंतर लेकाला पाहून आशुचे आई-वडील आनंदाश्रू वाहू लागेल.

हेही वाचा – NCP : जयंत पाटील निवडून आलेले नाही तर निवड झालेले प्रदेशाध्यक्ष; अजित पवार गटाचा युक्तिवाद

 सोडल्यानंतर आशुने असा केला संघर्ष 

यानंतर पोलिसांनी आशुच्या कुटुंबीयांची चौकशी केली आहे. आशुने सांगितले की, आशुने घरातून पळून गेल्यानंतर थेट कानपूरला गेला. तेथे सात महिने एका हॉटेलमध्ये काम केल्यानंतर नोएडाला गेला. नोएडामध्ये 4 महिने काढले. यानंतर आशुने मुंबईत आला, यानंतर आशुने मुंबईतील एका हॉटेल आणि कॉल सेंटरमध्ये काम केले. या कामातून मिळालेल्या पैशाने आशुने त्यांचे पुढचे शिक्षण घेतले. आशुने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून सध्या तो एका रियल इस्टेट क्षेत्रातील एका कंपनीत काम सुरू केले. आशुची महिन्याची कमाई ही लाखाच्या घरात असून त्यांनी आशु हा मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहतो.

First Published on: January 24, 2024 5:09 PM
Exit mobile version