महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्याला भारत-पाकिस्तान सीमेवरुन अटक

महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्याला भारत-पाकिस्तान सीमेवरुन अटक

महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्याला भारत-पाकिस्तान सीमेवरुन अटक

मुंबई पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे. महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्या इसमाला मुंबई पोलिसांनी भारत-पाकिस्तान सीमेवर जाऊन अटक केली आहे. या इसमाच्या नातेवाईकांनी त्याच्या अटकेवर प्रचंड विरोध केला. या विरोधाला न जुमानता पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याला मुंबईत आणले. या इसमाचे नाव मेहफूज मोहम्मद राशिद खान असे आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईच्या वडाळा येथील एका महिलेला व्हाटस अॅपवर काही महिन्यांपूर्वी अनोळखी क्रमांकावरुन अश्लील व्हिडिओचा मॅसेज आला होता. एकामागोमाग असे अनेक व्हिडिओ त्या नंबरवरुन आले होते. महिलेने आपल्या पतीकडे याबाबत तक्रार केली. तिच्या पतीने त्या नंबरवर फोन केला तर व्हिडिओ पाठवणाऱ्या आरोपी खानने ‘मला व्हिडिओ पाठवावेसे वाटले म्हणून पाठवले. तुम्हाला जे करायचे आहे ते करा’, असे सांगितले. यानंतर महिलेच्या पोलिसांनी वडाळा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३५४(अ)१ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार खानच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यासंदर्भात ‘मीड डे’ या दैनिकाने वृत्त प्रकाशित केले आहे.

पोलिसांनी ‘असा’ लावला तपास

वडाळा पोलिसांनी तो नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दिवस ते शक्य झाले नाही. अखेर १७ मे रोजी तो नंबर जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमधील बाफ्लियाज गावात ट्रेस झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांचे एक पथक जम्मू-काश्मीरला रवाना झाले. १९ मे रोजी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला राजौरी पोलीस स्थानकात आणेपर्यंत त्याच्या कुटुंबियांनी प्रचंड विरोध केला. मात्र त्या विरोधाला न जुमानता पोलिसांनी आरोपीला मुंबईत आणले. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला.

First Published on: May 22, 2019 12:57 PM
Exit mobile version