पोलिसांच्या ८ तास ड्युटीचा कित्ता देशभरात गिरवला जाणार?

पोलिसांच्या ८ तास ड्युटीचा कित्ता देशभरात गिरवला जाणार?

पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर

राज्यातल्या पोलिसांना आठ तास काम करण्याच्या नियमाचे पालन आता देशभरातल्या पोलिसांना करावे लागण्याची शक्यता आहे. उत्तरांचल उच्च न्यायालयाने त्या राज्य सरकारला ‘महाराष्ट्राचा कित्ता गिरवा आणि पोलिसांना आठ तासाच्या कामाचा अवधी निश्चित करा’, असे आदेश दिले आहेत.

हरिद्वार येथील एक याचिकाकर्ता अरुण कुमार भदोरीया यांनी आठ तासाच्या ड्युटीची ही याचिका उत्तरांचल उच्च न्यायालयात दाखल केली होती. १२ तास ड्युटीमुळे पोलिसांना मानसिक आणि शारीरिक आजार जडतात, असे भदोरिया यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. उत्तरांचल पोलिसांना विविध आजारांनी ग्रासले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणण्याला पुष्टी देत महाराष्ट्रात आठ तासाचा कामाचा अवधी असेल तर तुमच्याकडे तो का नाही? अशी विचारणा केली.

महाराष्ट्रात ८ तासांची ड्युटी ३ मे २०१६ पासून सुरू करण्यात आली. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी या कालावधीची घोषणा केल्यावर जानेवारी महिन्यापासून हा अवधी महाराष्ट्रात लागू झाला. आता उत्तरांचल उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सध्या देशभरातल्या पोलिसांना महाराष्ट्राचा कित्ता गिरवावा लागेल, असे दिसत आहे.

First Published on: May 18, 2018 7:45 AM
Exit mobile version