Holi 2021: ‘या’ गावात एकमेकांवर विंचू फेकून खेळली जाते डेंजर होळी!

Holi 2021: ‘या’ गावात एकमेकांवर विंचू फेकून खेळली जाते डेंजर होळी!

Dhulivandan : देशभरात धुलिवंदनाचा उत्साह शिगेला, पंतप्रधानांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

आज देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र काही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने होळी साजरा करण्यावर सरकारने निर्बंध घातले असल्याने काही राज्यातील रस्ते, गजबजलेल्या गल्ल्या माणसांविना ओस पडल्याचे चित्र आहे. खरंतर होळी साजरा करण्यासाठी देशातील अनेक शहरांमध्ये वैविध्यता आढळून येते. वृंदावनमध्ये होळी पाण्यांच्या वर्षावासह फुलांनी साजरी केली जाते. तर काशी शहरातील मणिकर्णिका घाटात मृतांच्या अस्थी एकमेकांवर उधळून होळी खेळली जाते.

पण, तुम्हाला माहिती आहे की इटावा येथे एक गाव आहे जिथे रंग, पाण्याऐवजी विंचू एकमेकांच्या अंगावर फेकून होळी खेळली जाते. विंचूचे नाव ऐकताच तुमच्या अंगावर काटा आला असेल, पण हे अगदी खरे आहे … इटावा येथे गावाच्या पायथ्याशी हे विंचू बिळात राहतात. थोडे मोठे झाल्यास ते गावात फिरतात लहान मुलं देखील त्यांना हातात घेतात. त्यामुळे विशेष होळीच्या दिवशी देखील मुले रंगाचा वापर न करता विंचूच एकमेकांच्या अंगावर टाकतात.

विंचूचं नाव घेताच आपल्या मनात भिती निर्माण होते. मात्र इटावाच्या ताखा भागातील सौंथना गावात होळीच्या दिवशी शेकडो विंचू एकत्र त्यांच्या बिळातून बाहेर पडतात. जे गावकऱ्यांशी जणू मैत्री करण्यास आल्याचे चित्र यावेळी दिसते. वैज्ञानिक युगात वावरत असताना या गावातले हे दृश्य काहिसं रहस्यमयच वाटते. होळीच्या दिवशी ढोल ताश्यांचा आवाज येताच अनेक विंचू त्यांच्या बिळातून बाहेर पडतात. जणू ते होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असावे, असे सांगितले जाते.

सौंथना गावचे रहिवासी असे सांगतात, होळीच्या दिवशी होळीचे गाणे गात असताना अनेक दशकांपासून विंचू या गावच्या पायथ्याशी असणाऱ्या बिळातून निघत आलेत. विशेष म्हणजे, होळीच्या दिवशी हे विषारी विंचू कुणालाही दंश करत नाहीत. मात्र होळीनंतर घरात जेव्हा हेच विंचू येतात तेव्हा ते दंश मारतात आणि त्यांचे विष देखील माणसाच्या शरीरात पसरते.


First Published on: March 29, 2021 3:25 PM
Exit mobile version