Covid-19 सर्व वेरीयंटविरोधात एकच औषध शोधण्यात यश

Covid-19 सर्व वेरीयंटविरोधात एकच औषध शोधण्यात यश

अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नवनवीन सापडणाऱ्या कोरोना वेरीयंटने जगभराची झोप उडवली आहे. अगदी विमान प्रवासबंदीपासून ते ठराविक देशातील नागरिकांना रोखण्यासारखे कठोर निर्णय अनेक देशातील सरकारांमार्फत घेण्यात आले आहेत. पण वेरीयंटविरोधातच आता प्रभावी औषध तयार झाल्याचा दावा कॅनेडियन आणि अमेरिकन संशोधकांनी केला आहे. Covid-19 च्या धोकादायक अशा वेरीयंट ऑफ कन्सर्न (VOC) च्या निमित्ताने एन्टीव्हायरल औषध तयार करण्यात यश मिळवल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. N-0385 हे औषध Sard-Co-V-२ चे विषाणू शरीरातील सेल्समध्ये प्रवेश करण्यापासून रोखतात असा या संशोधकांचा दावा आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या वॅनकोवर विद्यापिठाने या संशोधनाबाबतची माहिती प्रकाशित केली आहे. या अभ्यासाला BioRXiv या जरनलच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले आहे. तर या अभ्यासाशी संलग्न अशा क्युबेकच्या शेरब्रोक आणि अमेरिकास्थित कॉर्नल विद्यापिठानेही या संशोधनामध्ये योगदान दिले आहे.

या नव्या औषधामुळे मृत्यूदर कमी होईल असा संशोधकांचा दावा आहे. तसेच अनेक वेपरीयंटविरोधात हे औषध काम करत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख आणि ब्रिटशी कोलंबिया विद्यापिठात मायक्रोबायोलॉजी आणि इम्युनोलॉजी विभागाचे प्रमुख असलेले डॉ फ्रॅन्कोईस जिन यांच्या दाव्यानुसार हे आतापर्यंतचे अतिशय परिणामकारक असे औषध आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने उंदराचा वापर संशोधनासाठी करण्यात आला होता. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरत आहे. कोरोनाच्या संसर्गाविरोधात सुरूवातीच्या टप्प्यात उपचार करण्यासाठी हे औषध उपयुक्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेमध्ये २०२०-२१ या शालेय वर्षासाठी मास्क वापरण्याच्या सूचना दुसरीकडे अमेरिकेने दिल्या आहेत. अमेरिकेत सध्या ३३ दशलक्ष लोकसंख्येने म्हणजे एकुण लोकसंख्येच्या १५ टक्के लोकसंख्येने लस घेतली आहे. एकुण लोकसंख्येच्या तुलनेत लस घेणाऱ्यांचा टक्का अमेरिकेत अजुनही कमीच आहे. पण १५ टक्के लोकसंख्येला आतापर्यंत एक तरी डोस मिळाला आहे. या टक्केवारीचा लोकसंख्येला सुरक्षित करण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो असा अमेरिकेचा दावा आहे.


 

First Published on: May 17, 2021 7:58 PM
Exit mobile version