पंतप्रधान मोदींचा ‘नमो’द्वारे कर्नाटकच्या २५ लाख लोकांशी संवाद

पंतप्रधान मोदींचा ‘नमो’द्वारे कर्नाटकच्या २५ लाख लोकांशी संवाद

कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, कर्नाटकातील तब्बल २५ लाख लोकांशी एकाचवेळी संवाद साधला. भाजपच्या ‘नमो’ या अधिकृत सोशल मीडिया अॅपद्वारे काही लाईव्ह व्हिडीओंच्या माध्यमातून मोदींनी कर्नाटकच्या जनतेशी संवाद साधला. भाजपने असा दावा केलाय, की लोकांशी संवाद साधण्याचं अनोखं माध्यम वापरणारे मोदी हे एकमेव राजकीय नेते आहेत.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोंदीनी अनुसूचित जाती-जमातीतील नागरिक, झोपडपट्टीवासीय आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओद्वारे संवाद साधला. याविषयी बोलताना भाजपचे आयटी इनचार्ज अमित मालविया म्हणाले, ”नमो अॅपच्या माध्यमातून मोदींनी एकाचवेळी कर्नाटकचे स्थानिक नागरिक, भाजपचे कार्यकर्ते तसेच सपोर्टर्स मिळून जवळपास २५ लाख लोकांशी एकाचवेळी संवाद साधला.”

मालविया पुढे म्हणाले की, ”आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी वेळोवेळी व्हिडीओच्या माध्यमातून अशाचप्रकारे लोकांशी संवाद साधत राहतील. गेल्या काही आठवड्यांध्ये मोदींनी या माध्यमातून कर्नाटकातील शेतकरी, महिला तसंच तरुण वर्गाशी सातत्याने संवाद साधला. या तिन्ही वर्गातील लोकांच्या समस्यांना उत्तरे देण्याचं काम मोदींनी व्हिडीओद्वारे केलं आहे. यापुढेही मोदी अशाच तऱ्हेने लोकांच्या समस्या जाणून घेत, त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करतील.” या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्थानिक लोक थेट मोदींशी जोडले जातील, असा विश्वास मालविया यांनी व्यक्त केला आहे. जवळपास १० लाख लोकं ‘नमो’ अॅप वापरत असल्याचंही मालविया म्हणाले.

First Published on: May 14, 2018 8:44 AM
Exit mobile version