जगभरातील नेत्यांपैकी पंतप्रधान मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते, जो बायडेंनाही टाकलं मागे

जगभरातील नेत्यांपैकी पंतप्रधान मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते, जो बायडेंनाही टाकलं मागे

GST च्या व्यवहारांवरून CAG ने सरकारवर ओढले ताशेरे, जाणून घ्या CAG अहवालातील खास गोष्टी

अमेरिकेतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील नेत्यांपैकी सर्वाधिक लोकप्रयेतेत प्रथम स्थान पटकावलं आहे. जगातील नेत्यांच्या लोकप्रियतेच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७० टक्के गुणांकन मिळालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनाही मोदींनी लोकप्रियतेच्याबाबतीत मागे टाकलं आहे. जगातील पहिल्या १३ नेत्यांमध्ये सर्वाधिक रेटिंग पंतप्रधान मोदींना मिळाले आहे. मोदींनंतर दुसऱ्या स्थानी ६० पेक्षा अधिक रेटिंग मिळवलेले मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेजे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचा नंबर आहे. तर तिसऱ्या स्थानी इटालियनचे पंतप्रधान मारिओ द्रागी आहेत.

मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील नेत्यांपैकी सर्वाधिक लोकप्रिय असून ते उत्तम काम करत आहेत. १३ देशांतील नेत्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेटिंग ७० टक्के आहे तर मोदींशिवाय फक्त दोन नेत्यांनाच ६० पेक्षा अधिक रेटिंग मिळाले आहे. यामध्ये ६४ रेटिंगसह मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेजे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तर ६३ रेटिंग इटालियनचे पंतप्रधान मारिओ द्रागी यांचा नंबर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या सर्वेक्षणात रेटिंग ही ४८ आहे. तर जर्मनीच्या चॅन्सलेर अँजेला मर्केल या चौथ्या स्थानावर असून त्यांची अप्रूव्हल रेटिंग ५२ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रियतेच्या यादीत प्रथम स्थानावर असले तरी त्यांच्या लोकप्रियतेमध्ये घसरण झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेटिंग ८४ टक्के होती. कोरोनाच्या कालावधीत झालेल्या निष्काळजीपणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आहे.

सर्वेक्षणानुसार रेटिंग यादी

नरेंद्र मोदी- ७०%

लोपे ओब्रॅडर- ६४%

मारियो द्राघी- ६३%

एंजेला मार्केल- ५३%

जो बायडेन- ४८%

स्कॉट मॉरिसन- ४८%

जस्टिन ट्रूडो- ४५%

बोरिस जॉनसन- ४१%

जेर बोल्सोनॅरो- ३९%

मून जे-इन- ३८%

पेड्रो सांचेज- ३५%

इमॅनुएल मॅक्रों- ३४%

योशिहिदे सुगा- २५%


हेही वाचा : ‘चीन’ च्या पैशांवर तालिबानची मदार, म्हणताहेत चीन जगभरातील बाजारातलं ‘एन्ट्री कार्ड’


 

First Published on: September 5, 2021 4:01 PM
Exit mobile version