नासा चक्क ‘जोकर’च्या शोधात

नासा चक्क ‘जोकर’च्या शोधात

नासा चक्क जोकरच्या शोधात

अंतराळात एखाद्या मोहिमेकरता जाण्यासाठी अंतराळवीर खुप मेहनत घेतात. सामान्यत: अंतराळवीर हे शांत आणि गंभीर स्वभावाचे असतात. अंतराळातील वातावरण गंभीर असणे गरजेचे असते कारण त्यांना तिथे अनेक शोध लावायचे असतात आणि कामाकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचे असते. मात्र आता ‘नासा’ची टीम काहीतरी नवीन करण्याचा विचार करत आहे. २०३० मध्ये मंगळ ग्रहावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासाठी टीममध्ये एका जोकरची भरती करणार असल्याचे सांगितले जात आहे.

जोकरच्या नावाचा विचार

२०३० मध्ये नासाची टीम मंगळ ग्रहावर जाणार आहे. या मोहिमेचं नाव ‘मिशन मार्स’ असे आहे. हे मिशन साधारण दोन वर्षांचं असेल. मिशन म्हटले की टेंशन हे येतचं. सलग दोन वर्ष अंतराळामध्ये काढण्यासाठी अंतराळवीर टेंशनमध्ये येतात. पण हेच टेन्शन दूर करण्यासाठी नासा एका जोकरच्या शोधात आहे. जेणेकरुन अंतराळामधील अंतराळवीरांना कुढल्याही गोष्टीचं टेन्शन येणार नाही. तसेच तिथले वातावरण हे हसते-खेळते राहण्यासाठी हा वेगळा विचार नासाच्या टीमकडून केला जात आहे. शिवाय त्या जोकराचे नेमके नाव काय असेल, यावर नासा मिशन ग्रुप विचार करत आहेत.

तो वैज्ञानिक, इंजिनीअर असावा

‘अंतराळवीरांना कठीण आणि अडचणीच्या वेळी कुठल्याही प्रकारचं टेन्शन येऊ नये. यासाठी आम्ही अशा व्यक्तीला शोधत आहोत, जी व्यक्ती त्यांच्या कामाचा उत्साह वाढवेल. तसेच त्यांना आनंदी ठेवेल. कारण हे मिशन दोन वर्ष कालावधीचे आहे. अशावेळी अंतराळवीरांना कामाचा ताण येऊ शकतो. यासाठी असं काहीतरी नवीन करण्याचा विचार करत आहोत’, असे युनिव्हसिटी ऑफ फ्लोरिडामध्ये अँथ्रोपॉलॉजीचे प्राध्यापक जेफरी जॉनसन यांनी सांगितले आहे. तसेच ते असंही म्हटले की, ‘आम्हाला फक्त हसवणारा जोकर नको आहे. ज्याला फक्त हसवण्याची कला अवगत असेल. तर अशी व्यक्ती पाहिजे, जो चांगला वैज्ञानिक आणि इंजिनीअरसुद्धा असला पाहिजे’, अशा जोकराच्या शोधात नासा आहे.

First Published on: February 24, 2019 4:23 PM
Exit mobile version