नासाची टूर निघाली सुसाट

नासाची टूर निघाली सुसाट

NASA

खाजगी अंतराळविरांना आता नासाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा वापर करता येणार आहे. नासाने स्पेस टुरीझम अंतर्गत दरवर्षी बारा अंतराळविरांसाठी या संधीचा लाभ घेता येईल. पण एका रात्रीसाठी ऑर्बिट रिसर्च लॅबचा वापर करण्यासाठी या अंतराळविरांना ३५ हजार डॉलर्स (२५ लाख रूपये) इतकी किंमत मोजावी लागेल. शक्य झाल्यास वर्षातून दोन असे अंतराळ दौरे आयोजित केेले जातील. यामुळे बिगर शासकीय अंतराळविरांनाही स्पेस टुरीझम कंपनीच्या माध्यमातून एक उत्तम संधी मिळू शकेल, असे नासाचे म्हणणे आहे. नासाच्या या मिशनसाठी खाजगीरीत्या अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच डेडिकेटेड कर्मशीअल स्पेसफ्लाईट्सचा वापर यासाठी होईल असे नासाने स्पष्ट केले आहे.

नासाच्या या खाजगी मिशनसाठी अंतराळविरांसाठी अटी आणि शर्थी घालण्यात येणार आहेत. तसेच नासाकडून वैद्यकीय चाचण्या आणि विशिष्ठ प्रशिक्षणानंतरच यांची निवड मिशनसाठी करण्यात येईल. नासाकडून अशा पद्धतीच्या फ्लाईट्सची सुरूवात कधी करण्यात येईल याबाबतची तारीख मात्र अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. दौर्‍यासाठीचे स्पेस स्टेशन हे नासाच्या मदतीने रूस आणि इतर देशांनी मिळून १९९८ मध्ये तयार केले आहे. याआधी खूपच कमी लोक याठिकाणी स्पेस मिशनअंतर्गत जाऊन आले आहेत.

First Published on: June 9, 2019 5:40 AM
Exit mobile version