Biggest Asteroid To Hit Earth: तीन दिवसांनी पृथ्वीवर येणार मोठं संकट, NASAचा इशारा

Biggest Asteroid To Hit Earth: तीन दिवसांनी पृथ्वीवर येणार मोठं संकट, NASAचा इशारा

तीन दिवसांनी पृथ्वीवर येणार मोठं संकट, NASAचा इशारा

अनेक दिवसांपासून पृथ्वीवर लघुग्रहामुळे (Asteroid) मोठं संकट येणार असल्याचे सांगितले जात आहे. लघुग्रह हे अवकाशात पृथ्वीभोवती फिरत असतात. आतापर्यंत एकदाच लघुग्रह पृथ्वीवर आदळल्याचे म्हटले जाते. यामुळे जगातील डायनासोर नष्ट झाले होते. तेव्हापासून अनेक लघुग्रह पृथ्वी जवळून गेले आहेत (Asteroid To Cross Earth Orbit). पण सुदैवाने अजूनही लघुग्रहाची पृथ्वीसोबत टक्कर झालेली नाही. मात्र आता १८ जानेवारीला आतापर्यंतचा सर्वात मोठा लघुग्रह पृथ्वाच्या खूप जवळून जाणार आहे. या लघुग्रहाला नाव ७४८२ (1994 PC1) असे देण्यात आहे.

आजपासून तीन दिवसांनंतर १९ जानेवारीला वर्षात पहिला लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. माहितीनुसार, या लघुग्रहाची रुंदी सुमारे ३ हजार ५९१ फूट आहे. तज्ज्ञांच्या मते, हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे १.२ मिलियन मैलावरून जाणार आहे. संख्येनुसार जरी तुम्हाला हे खूप दूर वाटत असले तरी यामुळे पृथ्वीवर होणाऱ्या धोक्याचे आकलन केले तर नासाच्या म्हणण्यानुसार पृथ्वीला धोका आहे.

नासा सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजने आपल्या वेबसाईटवर लिहिले आहे की, हा लघुग्रह पोटेंशियली हजार्डस आहे. यामुळे पृथ्वीला धोका आहे. नासाच्या तज्ज्ञ बऱ्याच काळापासून या लघुग्रहावर अभ्यास करत होते. आता १८ जानेवारीला म्हणजे मंगळवारी हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण मध्ये लघुग्रह खेचला तर पृथ्वीसोबत त्याची टक्कर होऊ शकते. आणि एवढा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर पृथ्वाचा विशान होऊ शकतो.

दरम्यान नासा भविष्यात लघुग्रहाची पृथ्वीसोबतची टक्कर रोखण्यासाठी मार्ग शोधत आहे. यासाठी नासाने डार्ट मिशन लाँच केले आहे. गेल्या आठवड्यात पृथ्वीच्या जवळून एक लघुग्रह गेला होता. परंतु आता जो लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा लघुग्रह असणारा आहे.


हेही वाचा –ओमिक्रॉनच्या दहशतीत भारतीयांसाठी दिलासादायक बातमी


 

First Published on: January 15, 2022 9:33 AM
Exit mobile version