एअर फोर्सने केला ‘हा’ मोबाइल App लाँच, करिअरशी संबंधित मिळेल सर्व माहिती

एअर फोर्सने केला ‘हा’ मोबाइल App लाँच, करिअरशी संबंधित मिळेल सर्व माहिती

एअर फोर्सने केला 'हा' मोबाइल App लाँच, करिअरशी संबंधित मिळेल सर्व माहिती

एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी सोमवारी ‘एमवाय आयएएफ’ (MY IAF) हे मोबाईल App लाँच केले आहे. या App मध्ये भारतीय हवाई दलात सामील होण्यासाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांना करिअरची माहिती दिली जाईल.

हवाई दलाने सांगितले की, डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत हवाई दलाच्या भवनमध्ये हे App लाँच करण्यात आले. याचा वापर खूप सोपा आहे. यामध्ये हवाई दलातील अधिकारी आणि हवाई दलाच्या निवड प्रक्रिया, प्रशिक्षण कार्यक्रम पगार आणि भत्ते इत्यादींविषयी माहिती देण्यात आली आहे.

सेंटर डेव्हलपमेंट ऑफ अॅडवांस कॅप्युटिंग (सी-डॅक)च्या सहकार्याने हा App विकसित केला आहे. हा App गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याची लिंक भारतीय हवाई दलाच्या सोशल मीडियावरील अकाऊंटशी जोडलेली आहे. यामध्ये हवाई दलातील वीरपणाच्या कथा आणि इतिहास आहे.

गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया म्हणाले होते की, हवाई दलाने आपल्या कार्यक्षम क्षमतांमध्ये आणखी वाढ करण्याची आवश्यकता आहे. तसेच वरिष्ठ हवाई अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनात एअर चीफ मार्शल भदौरिया म्हणाले होते की, सध्याची आव्हाने पाहता भारतीय हवाई दलाला जास्तीत जास्त कामकाजासाठी तयार राहावे लागेल. तसेच त्यांनी हवाई दलाच्या कमांड तयारीबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सर्व वायुसेना आणि सद्य आणि भविष्यातील हवाई कारवाईसाठी तयार राहण्यास सांगितले.

दुसरीकडे चीनशी झालेल्या चर्चेत भारतीय लष्कराने स्पष्ट केले की, ‘नियंत्रण रेषेत (एलएसी) बदलण्याचा चिनी हेतू त्यांना मान्य नाही. जर चीनने आपले सैन्य मागे सरकवले नाही तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे लागेल. दुसरीकडे चीनशी झालेल्या चर्चेत भारतीय लष्कराने हे स्पष्ट केले की, जर चीवचे सैन्य मागे गेले नाही तर त्याचे परिणाम भोगायला चीनला तयार राहावे लागेल.

First Published on: August 25, 2020 12:20 AM
Exit mobile version