LAC वर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून आर्मी कमांडर्सची कॉन्फरन्स सुरू

LAC वर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून आर्मी कमांडर्सची कॉन्फरन्स सुरू

एलएसीवरून चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या सर्वोच्च लष्करी कमांडर्सची एक मोठी परिषद आजपासून सुरू होणार आहे. लष्कर कमांडर्स कॉन्फरन्स (एसीसी -२०) २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याची माहिती सैन्याच्या वतीने ट्वीट करुन माहिती देण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या नियोजन व अंमलबजावणी प्रक्रियेसाठी ही एक अतिशय महत्वाची कॉन्फरन्स असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान लष्कर कमांडर्स (एसीसी -२०) ही कॉन्फरन्स २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर आयोजित करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या नियोजन व अंमलबजावणी प्रक्रियेसाठी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सध्या सुरू असलेल्या सीमा वाद- विवाद आणि स्रोतांच्या वितरणासाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुधारणांसंदर्भात पूर्व लदाखमध्ये लष्कराच्या शीर्ष कमांडर्सची बैठक चीनबरोबर होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशाला भेडसावत असलेल्या सुरक्षा आव्हानांचा आढावा घेण्याव्यतिरिक्त, सैन्य कमांडर संसाधनाच्या वापरासाठी विविध सुधारात्मक उपायांसाठी वेगवेगळ्या समित्या अंतर्गत केलेल्या शिफारसींवरही चर्चा होणार आहे. यासह, १३ लाख कर्मचारी असलेल्या दलाची परिचालन क्षमता वाढविण्यावर देखील भर दिला जाणार आहे. तर संमेलनाचे अध्यक्ष सैन्य प्रमुख जनरल एम.एम. नरवणे हे असतील आणि सर्व प्रमुख सैन्य कमांडर यात सहभागी होणार आहे.


अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या, अन्यथा अराजकता माजेल; उद्धव ठाकरेंचा मोदींना इशारा

First Published on: October 26, 2020 9:21 AM
Exit mobile version