पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीचे पत्र व्हायरल; वाचा! तरी काय लिहीले आहे

पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीचे पत्र व्हायरल; वाचा! तरी काय लिहीले आहे

पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीचे पत्र व्हायरल

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून या महामारीचे देशावर संकट आले आहे. तसेच या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहिर केले आहे. मात्र, या लॉकडाऊन दरम्यान, कोणी घराबाहेर पडून नये, याकरता पोलिसांना मात्र, घराबाहेर पडावे लागत आहे. सध्या पोलीस आणि डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून देशातील नागरिकांचे रक्षण करत आहेत. दरम्यान, दिल्लीतील पोलीस कॉन्स्टेबल अनिल कुमार यांच्या मुलीचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे या पत्रात

पोलीस कॉन्स्टेबल अनिल कुमार यांची मुलगी चौथीत शिकत असून तिने आपल्या वडिलांना हे पत्र लिहून दिले आहे. या पत्रात ती म्हणाली आहे की, ‘पप्पा तुम्ही दिवसरात्र घराबाहेर राहता आणि लोकांना घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन करत आहात’. तसेच हे पत्र देऊन एसएचओला देण्याची विनंती देखील त्या चिमुरडीने केली. हे पत्र वाचून एसएचओ म्हणाले की, ‘आपल्या लहान मुलांना हे कळत आहे की, कोणीही घराबाहेर पडू नये, मात्र, मोठ्यांना हे का कळत नाही’. तसेच एसएचओ यांनी लोकांना प्रेरणा मिळावी, याकरता हे पत्र पुढे पाठवले आहे.

जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या १० लाखांहून अधिक!

आतापर्यंत जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या १० लाख २२ हजार १६३ वर पोहोचली आहे. त्यापैकी ५३ हजार ४२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २ लाख ९ हजार ८५२ कोरोनाग्रस्त रुग्ण रिकव्हर झाले आहेत. जगभरात सर्वाधिका कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले असून त्यापाठोपाठ इटली आणि स्पेन मध्ये आढळले आहेत.


हेही वाचा – ‘या’ टेलरला सलाम; दिव्यांग असूनही दिवसरात्र एक करून शिवले मास्क


 

First Published on: April 3, 2020 8:18 PM
Exit mobile version