Corona: ब्राझीलने मानले भारताचे आभार; ‘तुमची मदत जणू संजीवनी’!

Corona: ब्राझीलने मानले भारताचे आभार; ‘तुमची मदत जणू संजीवनी’!

पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्रपती

संपूर्ण जगावरच कोरोनाचे संकट घोंघावत आहे. अशामध्ये काही देश एकमेकांकडे मदत मागत आहेत. माणसाच्या जीवन-मृत्यूचा प्रश्न असल्यामुळे हे देशही एकमेकांची मदत करत आहेत. अशीच एक मोलाची मदत भारताने ब्राझील देशाला केली आहे. त्यासाठी ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी भारताचे आभार मानले आहेत. ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोलसोनारो यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून भारताने केलेल्या मदतीची तुलना रामायणातील हनुमानाने आणलेल्या संजीवनीसोबत केली आहे. त्यांनी भारत आणि ब्राझील यांच्यातील मैत्रीचादेखील उल्लेख केला. यापूर्वी भारताने अमेरिकेलाही मदत केली आहे.

ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी म्हटले आहे की,

‘संकटात भारताने ब्राझीलची मदत केली. ही मदत रामायणातील हनुमानाने रामाचे भाऊ लक्ष्मण यांना वाचवण्यासाठी आणलेल्या संजीवनी सारखीच आहे. त्यांच्या देशात २ लॅब कोरोनावर वॅक्सीन बनवत आहे. पण याची निर्यात पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताकडून मदतीची अपेक्षा आहे, असेही बोलसोनारो यांनी नमूद केले आहे. ब्राझीलने भारताचे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनसाठी आभार मानले आहेत. ज्या देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची खूप गरज आहे. अशा देशांना भारत मदत करेल, असे काल भारताने म्हटले होते.

जगात कोरोनाचा कहर 

जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर अनेक देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन देखील केले आहे. मात्र, लॉकडाऊन करुन देखील मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. तर अमेरिकेत कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगभरात आतापर्यंत ८१ हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये जवळपास ५० हजारहून जास्त लोकांचा मृत्यू युरोपियन देशांमध्ये झाला आहे. तर स्वीडनमध्ये गेल्या २० तासांत १०० हून जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्येदेखील कोरोनामुळे १० हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

हेही वाचा –

भारत लवकरच कोरोनाग्रस्तांवर आयुर्वेदाने उपचार करेल; आयुषमंत्र्यांचा दावा

First Published on: April 8, 2020 1:16 PM
Exit mobile version