घरCORONA UPDATEभारत लवकरच कोरोनाग्रस्तांवर आयुर्वेदाने उपचार करेल; आयुषमंत्र्यांचा दावा

भारत लवकरच कोरोनाग्रस्तांवर आयुर्वेदाने उपचार करेल; आयुषमंत्र्यांचा दावा

Subscribe

आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत.

भारत लवकरच आयुर्वेदिक पद्धतीने कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करेल, असा आत्मविश्वास केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की वैज्ञानिकांना लस अद्याप विकसित करता आली नाही. त्यामुळे भारताची ही प्राचीन वैद्यकीय यंत्रणा सध्याच्या संकटकाळात केवळ खबरदारीचा उपाय म्हणून वापरली जात आहे. कोविड-१९ पासून संक्रमित ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांच्यावर आयुर्वेदिक पद्धतींनी उपचार केले गेले आहेत, असा वादग्रस्त दावा नाईक यांनी पुन्हा एकदा केला. मंत्री म्हणाले की प्रिन्स चार्ल्स हा दावा फेटाळत आहेत कारण पाश्चात्य देशांमध्ये आयुर्वेद मान्य नाही. यापूर्वी नाईक म्हणाले होते की बेंगळूरमधील एका डॉक्टरने चार्ल्स यांच्यावर उपचार केले आहेत. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, प्रिन्स चार्ल्स हा दावा फेटाळत आहेत कारण हा दावा स्वीकारण्यात काही अडचणी येत असतील. आयुर्वेद त्यांच्या देशात मान्य नाही आहे. ते म्हणाले की ते नाकारणे त्यांच्यासाठी स्वाभाविक आहे. माझा शंभर टक्के असा विश्वास आहे की आयुर्वेदाने त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.


हेही वाचा – रोहितने विचारलं नवीन आणि जुन्या संघात फरक काय?; युवराजने दिलं ‘हे’ उत्तर

- Advertisement -

आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत.

सामान्य उपाय

१. दिवसभर गरम पाणी प्या.
२. दररोज ३० मिनिटं योगासन, प्राणायाम आणि ध्यानसाधना करा.
३. जेवणात हळद, जिरा, धनिया आणि
लसूणचा वापर करा.

आयुर्वेदिकपद्धतीने रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या टीप्स

१. सकाळी १० ग्रॅम चवनप्राश घ्या. मधुमेह असलेल्यांनी साखरमुक्त चवनप्राश घ्यावे.
२. दिवसातून एक किंवा दोनदा तुळस, दालचिनी, काळी मिरी, आलं आणि मनुका पासून बनवलेला हर्बल चहा प्या. आवश्यक असल्यास गूळ आणि लिंबाचा रस घाला.
३. गोल्डन मिल्क- अर्धा चमचा हळद १५० मिली गरम दुधात घालून दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या.

- Advertisement -

सोपी आयुर्वेदिक प्रक्रिया

१. नाकाचा वापर – तीळ तेल / नारळ तेल किंवा तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी घाला.
२. तेल थेरपी- १ चमचा तीळ किंवा नारळ तेल तोंडात घ्या. गिळंकृत करु नका. २ ते ३ मिनिटे तोंडात ठेवा आणि त्या नंतर थुंकून टाका. त्यानंतर गरम पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. दिवसातून एकदा किंवा दोनदा हे करता येतं.

कोरडा खोकला, घशात खवखवणे

१. पुदीन्याची पाने किंवा अजवाईनची (कॅरवे बियाणे) वाफ दिवसातून एकदा घेऊ शकता.
२. घशात खवखवत असत असेल तर लवंग पावडर साखर/मधात मिसळून घ्या.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -