काश्मिरमध्ये लष्कराच्या कारवाईत ४ दहशतवादी ठार!

काश्मिरमध्ये लष्कराच्या कारवाईत ४ दहशतवादी ठार!

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय एक जवान शहीद

दक्षिण काश्मिरमध्ये गेले तीन दिवस सातत्याने दहशतावादी हल्ले होत आहेत. रविवारी रात्री उशीरा झालेल्या कुलगावमध्ये झालेल्या चार तासाच्या चकमकीत सैनिकांनी चार दहशतवाद्यांना गोळी घालून मारलं आहे. या हल्ल्यात एक मेजर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मुठभेड स्थळी असलेले दारूगोळा आणि बारूद उद्धव्सत करण्यात आलं आहे. काश्मिर येथील पोलिसांनी सांगितलं की, या ऑपरेशनमध्ये जवान, सीआरपीएफ आणि पोलिसांनी एकत्रीत येत हे अभियान राबवले. दहशतवाद्यांच्या विरोधात सुरू केलेलं हे सगळ्यात मोठं अभियान आहे.

 

दहशतवाद्यांनी रात्री उशीरा त्या विभागात लपून बसले होते. यावळी या ठिकाणी असलेल्या गस्त घालणाऱ्या सैनीकांच्या तुकडीवर अचानक हल्ला सुरू केला. जवानांनी आपल्याला वाचवत दहशतवाद्यांवर कारवाई केली. या दरम्यान विशेष दलातील पोलिसही त्या ठिकाणी पोहचले. दोघांनी दहशतवाद्यांना चारही बाजूने घेरले. १० वाजायच्या आत दोन दहशतवादी आणि त्याच्या आर्ध्या तासानंतर आणखी दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं आहे. दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाहीये.

आणखी काही दहशतवादी लपून बसले असतीय या संशयामुळे जवानांनी त्या संपूर्ण परिसराला चारही बाजूने वेढलं आहे. या हल्ल्यात मेजर यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यानंतर लगेचच जवानांनी मेजर यांना हॉस्पिटलला नेले.

जवानांनी १ एप्रिलपासून आत्तापर्यंत २६ दहशतवाद्यांना मारले आहे. या वर्षात आत्तापर्यंत ५८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.  जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती खराब करण्यासाठी दहशतवादी संघटना सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात कट रचत आहेत. यामुळे सलग तीन दिवस तीन चकमकी झाल्या. अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यात सैन्य, सुरक्षा दलाने चार अतिरेकी ठार केले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. काश्मीरमध्ये गेल्या दहा दिवसांत अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर पाच वेळा हल्ले केले आहेत. मात्र, सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही.

एलओसीची लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे म्हणाले की, एकीकडे भारत आणि जग कोरोनाविरूद्ध युद्ध लढा देत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तान दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात व्यस्त आहे. सैन्याच्या सरदारांना यापूर्वीच शत्रूच्या खोडसाळ हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची सूचना देण्यात आली आहे.


हे ही वाचा – भारतातील पहिली प्लाझ्मा थेरपी पूर्ण, २३ वर्षाच्या मुलीने केलं प्लाझ्मा डोनेट!


 

First Published on: April 27, 2020 9:22 AM
Exit mobile version