घरCORONA UPDATEभारतातील पहिली प्लाझ्मा थेरपी पूर्ण, २३ वर्षाच्या मुलीने केलं प्लाझ्मा डोनेट!

भारतातील पहिली प्लाझ्मा थेरपी पूर्ण, २३ वर्षाच्या मुलीने केलं प्लाझ्मा डोनेट!

Subscribe

संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव झाला आहे. यात २३ वर्षाच्या स्मृती ठक्करने प्लाझ्मा डोनेट केला आहे. स्मृती समाजासाठी नवीन उदाहरण बनली आहे. या विषयी बोलताना स्मृती म्हणाली की, पॅरिसवरून जेव्हा अहमदाबादला परत आल्यानंतर तीची तब्येत खराब होऊ लागली. त्या नंतर तीने लगेचच डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्यानंतर स्मृती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यानंतर स्मृतीला हॉस्पिटलाला अडमिट करण्यात आलं. त्यानंतर स्मृतीच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आलं. सध्या स्मृती पुर्णपणे बरी झालेली नाहीये.

हॉस्पिटलमध्ये १४ दिवस राहिल्यानंतर स्मृती घरी परत आली. घरी परत आल्यानंतर स्मृती अनुभव शेअर केला आहे. स्मृती म्हणाली, घरी आल्यावर मला डॉक्टरांचा फोन आला. त्यांनी मला प्लाझ्मा थेरपीबद्दल समजावले. डॉक्टरांनी सांगितले की प्लाझ्मा थेरपी करताना अजिबात त्रास होत नाही. डॉक्टरांच बोलणं ऐकून मला खूप पॉझिटिव्ह वाटायला लागले. त्यामुळे मी ठरवलं की असा प्लाझ्मा डोनेट करून रूग्णांना मदत करायची.

- Advertisement -

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोना व्हायरसमधून बरे झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील रक्तातून प्लाझ्मा काढून कोरोना संक्रमीत रूग्णांच्या शरीरात सोडला जातो. कारण कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये या व्हायरसशी लढण्यासाठीच्या क्षमतेत वाढ झालेली असते. तीन आठवड्यानंतर रूग्णाच्या शरीरात प्लाझ्मा दिला जातो. त्यामुळे त्याची तब्येत सुधारण्यात मदत होते.

देशात दिवसेंदिवसकोरोनाचा फैलाव वाढत आहे. ३ मे पर्यंत लॉकडाऊन देशात लागू करण्यात आला आहे. मात्र मुंबई, पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘..तर केंद्राला राज्ये योगदान देणार नाहीत’, शरद पवारांनी लिहिलं मोदींना पत्र!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -