पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा नवजोत सिंह सिध्दू यांच्याकडे, कॅप्टन मुख्यमंत्रीपदी कायम राहणार

पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा नवजोत सिंह सिध्दू यांच्याकडे, कॅप्टन मुख्यमंत्रीपदी कायम राहणार

पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा नवजोत सिंह सिध्दू यांच्याकडे, कॅप्टन मुख्यमंत्रीपदी कायम राहणार

पंजाब काँग्रेस पक्षात सुरु असलेला वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी काँग्रेसमधील वादावार तोडगा काढत मोठं वक्तव्य केलं आहे. रावत यांनी म्हटलं आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंह हे पंजाब मुख्यमंत्री म्हणून राहतील तर नाराज नवजोत सिंह सिध्दू यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नवजोत सिंह सिध्दू यांच्यावर असणार आहे. तसेच दोन कार्यकारी अध्यक्षांचीही निवड करण्यात येणार आहे. अद्याप याबाबत घोषणा करण्यात आली नाही परंतु लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादावर आता तोडगा काढण्यात आला आहे. पंजाबमधील काँग्रेसमध्ये दोन गट पडले असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते नवजोत सिंह सिध्दू यांच्या गटाने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पंजाबमध्ये वाद सुरु आहे. सध्या पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुनील जाखड यांच्याकडे आहे. काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादावरुन तर्क लढवण्यात आले होते की, सुनील जाखड यांची खुर्ची धोक्यात आली असून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जाण्याची शक्यता आहे.

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ च्या पार्श्वभूमीवर कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या सरकारमध्ये नवे मंत्री सामील होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीच्या रणनितीसाठी पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत असल्याची चर्चा आहे. परंतु पक्षाची जबाबदारी हिंदू किंवा सिख नेत्याकडे द्यावी असे कार्यकर्त्यांचे मत होते.

राहुल गांधी-प्रियांका गांधींची बैठक

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादावर बुधवारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महासचिव प्रियांका गांधी वाड्रा आणि पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश रावत उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसमधील वादावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच बैठकीनंतर रावत यांनी म्हटलं आहे की, येत्या ३ ते ४ दिवसांत पक्षासाठी चांगली बातमी येईल. यामुळे पंजाब पक्षातील प्रत्येक सदस्य समाधानी होईल अशा बाबींवर चर्चा झाली असल्याचे हरीश रावत यांनी म्हटलं आहे.

First Published on: July 15, 2021 6:58 PM
Exit mobile version