अभिलाष टॉमी यांची, हिंद महासागरातून सुटका

अभिलाष टॉमी यांची, हिंद महासागरातून सुटका

भारतीय नौदलाचे अधिकारी- अभिलाष टॉमी (सौजन्य- Onmanorama)

अभिलाष टॉमी हे नाव सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतं आहे. हिंदी महासागरामध्ये ‘वर्ल्ड गोल्डन ग्लोब रेस’साठी गेलेले अभिलाष वादळात अडकले होते. अभिलाष टॉमी भारतीय नौदलाचे कमांडर आहेत. एकूण ३ दिवसांच्या अथक प्रयत्नांनतर अभिलाष यांची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या INS सातपुडा आणि ऑस्ट्रेलियन नौदल यांनी संयुक्त कारवाई करत अभिलाष यांचे प्राण वाचवले. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सध्या टॉमी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. वर्ल्ड ग्लोबल रेसमध्ये अभिलाष हे भारताचं प्रतिनिधित्व करत होते. रेसदरम्यान १३० किलोमीटर वेगाने हिंदी महासागर पार करत असताना त्यांच्या जाहाजाला अपघात झाला. त्यावेळी समुद्रामध्ये १० मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. मात्र, ज्यावेळी टॉमी यांचे ‘पाल’ हे जहाज समुद्राच्या मधोमध पोहोचले त्यावेळी अचानक आलेल्या वादामुळे समुद्रात १४ मीटर उंचीच्या लाटा तयार झाल्या.


वाचा : शहीद जवानाची पत्नी बनली लेफ्टनंट

कसा लागला तपास?

समुद्रात उठलेल्या या वादळामध्ये अभिलाषा यांना आपलं जहाज सावरणं कठीण जात होतं. जहाज सावरत असताना अभिलाष यांनाही बराच मार लागला, त्यांच्या पाठिला दुखापच झाली. याशिवाय त्याच्या जहाजाचंदेखील खूप मोठं नुकसान झालं. भारतीय नौदलाच्या विमानाने अभिलाष यांचं समुद्रामध्ये फसलेलं जहाज पाहिलं आणि त्यांना वाचवण्यासाठी तातडीने रेस्क्यु ऑपरेशनची सुरुवात केली. या कार्यात ऑस्ट्रेलियन नौदलाची त्यांना मदत मिळाली. तीन दिवसांच्या रेस्क्यु ऑपरेशननंतर अखेर अभिलाष यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे याआधी अभिलाष टॉमी यांनी जहाजातून एकदाही न थांबता जगाची परिक्रमा केली आहे. मात्र, यावेळी अभिलाष कमनशिबी ठरले असंच म्हणावं लागेल.

First Published on: September 24, 2018 5:31 PM
Exit mobile version