सायरस मिस्त्रींना धक्का! टाटांविरोधातले आरोप NCLTने फेटाळले

सायरस मिस्त्रींना धक्का! टाटांविरोधातले आरोप NCLTने फेटाळले

टाट सन्सच्या चेअरमनपदावरून हटवल्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने सायरस मिस्त्री यांना धक्का दिला आहे. टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हटवण्यात आल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. पण, आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने सायरस मिस्त्री यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सायरस मिस्त्री यांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी सायरस मिस्त्रींनी टाटा सन्सची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला होता. या याचिकेवर निकाल देताना नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने रतन टाटांवर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी टाट समुहाच्या व्यवस्थापकिय मंडळात कोणतीही गडबड नाही. शिवाय, सायरस मिस्त्रींनी लावलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून आरोप निराधार असल्याचे एनसीएलटीने म्हटले आहे.

का दाखल केली होती याचिका?

डिसेंबर २०१६मध्ये सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सचे व्यवस्थापकीय मंडळ कमकुवत झाल्याचा आरोप एका याचिकेद्वारे केला होता. टाट ग्रुपच्या ऑपरेटिंग कंपनीमध्ये रतन टाटा आणि टाटा ट्रस्टचे एन.ए. सुनावाला यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला होता. शिवाय, व्यवसायासंबंधी चुकीचे निर्णय घेतले जात असल्याचे देखील आरोपामध्ये म्हटले होते. शिवाय, टाटा सन्समध्ये ट्रस्टचा हस्तक्षेप नको असे देखील म्हटले होते. पण, सायरस मिस्त्री यांच्या सर्व मागण्या NCLTने फेटाळल्या आहेत. त्यामुळे सायरस मिस्त्री यांना मोठा धक्का बसला आहे.

First Published on: July 9, 2018 2:19 PM
Exit mobile version